महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत ‘इतक्या’ कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित

महाराष्ट्र राज्याच्या पात्र लाभार्थ्यांना आतापर्यंत २४०९३.४३१ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले

97
महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 'इतक्या' कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित
महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 'इतक्या' कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वर्ष २०२२-२३ साठी महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना ५ हजार ६५४ कोटींपेक्षा अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली असल्याचे माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना ही केंद्रीय क्षेत्रातील सर्वात मोठी योजना असून देशातील भूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पुरवण्यासाठी १ डिसेंबर २०१८ पासून लागू करण्यात आली आहे.

या योजने अंतर्गत, दर वर्षी ६००० रुपयांचा आर्थिक निधी तीन समान भागांमध्ये विभागून शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. आतापर्यंत देशभरातील ११ कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेतून २ लाख ६० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरीत करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्याच्या पात्र लाभार्थ्यांना आतापर्यंत २४०९३.४३१ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत राज्याच्या पात्र लाभार्थ्यांना आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ४३६.८१५ कोटी, वर्ष २०१९-२० मध्ये ४,८९८.८०६ कोटी, वर्ष २०२०-२१ मध्ये ६६७१.८०१ कोटी, वर्ष २०२१-२२ मध्ये ६४३१.३८४ कोटी तर वर्ष २०२२-२३ मध्ये ५६५४.६२५ कोटी रुपये इतकी रक्कम हस्तांतरित करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली.

(हेही वाचा – Rare Loggerhead Turtle : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा दुर्मिळ कासवाचे दर्शन)

सातारा जिल्ह्यातील पीएम-किसान सन्मान निधी लाभार्थ्यांना १२९५.९५ कोटी रुपयांचे वितरण

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात, एकूण मंजूर आणि सत्यापित प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) पात्र लाभार्थ्यांची संख्या ५,४९,३८५ आहे आणि योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत या लाभार्थ्यांना १,२५२.९५ कोटी रुपये वितरित करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.