Jitendra Singh : भारताने २०१४ – २३ या कालावधीत ३९६ परदेशी, ७० देशांतर्गत उपग्रह केले प्रक्षेपित

२०१४ - २३ या दशकात उपग्रह प्रक्षेपणातून मिळणारा महसूल १५७ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि २६० दशलक्ष युरो इतका आहे. २००३ - १३ या दशकात संबंधित आकडा १५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि ३२ दशलक्ष युरो होता.

95
Jitendra Singh : भारताने २०१४ - २३ या कालावधीत ३९६ परदेशी, ७० देशांतर्गत उपग्रह केले प्रक्षेपित

भारताने २०१४ – २३ या कालावधीत ३९६ परदेशी आणि ७० देशांतर्गत उपग्रह प्रक्षेपित केले,तर २००३ – १३ या कालावधीत भारताने ३३ परदेशी आणि देशांतर्गत ३१ उपग्रह प्रक्षेपित केले होते, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.

(हेही वाचा –  X Down : जगभरात ट्विटर ठप्प; नेटकरी हैराण)

काय म्हणाले जितेंद्र सिंह ? 

मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) पुढे म्हटले की, २०१४ – २३ या दशकात उपग्रह प्रक्षेपणातून मिळणारा महसूल १५७ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि २६० दशलक्ष युरो इतका आहे. २००३ – १३ या दशकात संबंधित आकडा १५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि ३२ दशलक्ष युरो होता, असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा –  Shambhuraj Desai : समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना)

येत्या काही वर्षांत या क्षेत्राची वाढ ६-८% दराने होईल – 

अंतराळ विभागाला दिलेली वार्षिक आर्थिक तरतूद आर्थिक वर्ष २०१३ – १४ मधील ६,७९२ कोटी रुपयांवरून २०२३ – २४  साठी १२,५४४ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. विविध जागतिक अंदाज आणि बातम्यांनुसार, येत्या काही वर्षांत या क्षेत्राची वाढ ६-८% दराने होईल, असे जितेंद्र सिंह यांनी (Jitendra Singh) सांगितले.

हेही पहा –  

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.