Red Sea Crisis : कच्च्या तेलाच्या किमती बुधवारी एका सत्रात का वाढल्या?

बुधवारी कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात अचानक दोन टक्क्याने वाढून ८० अमेरिकन डॉलर प्रती बॅरलवर पोहोचल्या.

209
Red Sea Crisis : कच्च्या तेलाच्या किमती बुधवारी एका सत्रात का वाढल्या?
Red Sea Crisis : कच्च्या तेलाच्या किमती बुधवारी एका सत्रात का वाढल्या?
  • ऋजुता लुकतुके

बुधवारी कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात अचानक दोन टक्क्याने वाढून ८० अमेरिकन डॉलर प्रती बॅरलवर पोहोचल्या. (Red Sea Crisis)

कच्च्या तेलाच्या किमतीत बुधवारपासून पुन्हा एकदा मोठी वाढ सुरू झाली आहे. मध्य-पूर्व आशियातील अशांतता आणि त्यातून जागतिक पुरवठा साखळी तुटण्याची निर्माण झालेली भीती यामुळे बुधवारी दुपारपासून अचानक तेलाच्या किमती वाढायला सुरुवात झाली. निमित्त झालं ते येमेनमधील इराण पुरस्कृत हौती बंडखोरांनी लाल समुद्रातील एका जहाजावर केलेला हल्ला. (Red Sea Crisis)

त्यामुळे तेल वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी लाल समुद्रामार्गे सुएझला जाण्याचा मार्ग बदलला. आणि लांबचा पल्ला पार करावा लागत असल्याने दरही वाढले. पण, ही सगळी घडामोड अचानक भारतीय वेळेनुसार, दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. (Red Sea Crisis)

सध्या तेल आणि माल वाहतूक विस्कळीत राहील अशीच शक्यता आहे. तेलाच्या किमतीत मात्र त्यामुळे २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड प्रती बॅरल ७९.८३ अमेरिकन डॉलरवर स्थिरावलं आहे. तर अमेरिकेतील टेक्सास क्रूडही ७४ अमेरिकन डॉलरवर आहे. (Red Sea Crisis)

(हेही वाचा – ICC Cricket Ranking : शुभमन गिलला हटवून बाबर आझम पुन्हा फलंदाजीत अव्वल)

तेलाच्या किमती इतक्या का वाढल्या?

बुधवारी, ग्रीस देशाने तेल वाहतूक करणाऱ्या बोटींना लाल समुद्र आणि एडन बेटाजवळ येमेनच्या हद्दीतील समुद्र टाळण्याचा इशारा दिला. येमेन स्थित हौती बंडखोर इस्त्रायलच्या पॅलेस्टिनी नागरिकांविरोधातल्या कारवाईचा निषेध म्हणून बोटींवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी खबर त्यांना मिळाली होती. लाल समुद्र टाळला तर बोटींना प्रवासासाठी लांबचा फेरा पडतो. त्यामुळे वाहतूक आणि विम्याचे पैसेही वाढतात. आणि त्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर झाला आहे. (Red Sea Crisis)

जगातील १२ टक्के तेल वाहतूक लाल समुद्रातून सुएझ कालव्यातून होते. तिचा मार्ग बदलल्याने हा परिणाम जाणवत आहे. (Red Sea Crisis)

आणि परिस्थिती हळू हळू पूर्ववत होत असल्याचं रॉयटर्स या वृत्तसंस्थेचं म्हणणं आहे. अजून तरी जगभरात कच्च्या तेलाचा तुटवडा भासलेला नाही आणि अमेरिकन नौसेनेनं लाल समुद्रात गस्तही सुरू केली आहे, असं रॉयटर्सने म्हटलं आहे. (Red Sea Crisis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.