ICC Cricket Ranking : शुभमन गिलला हटवून बाबर आझम पुन्हा फलंदाजीत अव्वल

एकदिवसीय मालिकेतून विश्रांती घेतल्यामुळे शुभमन गिलला फटका बसला आहे. 

155
ICC Cricket Ranking : शुभमन गिलला हटवून बाबर आझम पुन्हा फलंदाजीत अव्वल
ICC Cricket Ranking : शुभमन गिलला हटवून बाबर आझम पुन्हा फलंदाजीत अव्वल
  • ऋजुता लुकतुके

एकदिवसीय मालिकेतून विश्रांती घेतल्यामुळे शुभमन गिलला फटका बसला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमने एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतील अव्वल स्थान परत मिळवलं आहे. विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने बाबरकडून हे स्थान हिसकावून घेतलं होतं. पण, शुभमन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत नसल्यामुळे तो आता थोडासा मागे पडला आहे.

बाबर आझमने ८२४ रेटिंग गुण झाले आहेत. तर दुसऱ्या स्थानावरील शुभमनचे ८१० गुण आहेत. पहिल्या पाचात शुभमन बरोबरच विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय फलंदाज आहेत. श्रेयस अय्यरची बाराव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर के एल राहुल सोळाव्या स्थानावर वर चढला आहे.

गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज एकदिवसीय गोलंदाजाच्या यादीत पहिला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड आहे. भारताचा महम्मद सिराज ३ऱ्या, जसप्रीत बुमरा ५व्या तर कुलदीप यादव ८व्या स्थानावर आहेत.

मोहम्मद शामी विश्वचषकानंतर खेळलेला नाही. तो अकराव्या स्थानावर आहे.

(हेही वाचा – Indapur School Bus  Accident : शैक्षणिक सहलीला जाणाऱ्या बसचा अपघात; एक शिक्षक ठार तर पाच ते सहा व विद्यार्थी जखमी)

टी-२० क्रमवारीत भारताचा सुर्यकुमार यादव फलंदाजीत विक्रमी एक वर्षं अव्वल आहे आणि पुढील वर्षीच्या टी-२० विश्वचषकापर्यंत तोच अव्वल राहील अशी दाट शक्यता आहे. सुर्यकुमार खेरिज ऋतुराज गायकवाड (७वा) हा एकमेव भारतीय पहिल्या दहात आहे.

गोलंदाजीत इंग्लंडच्या आदिल रशिदने पहिल्यांदाच अव्वल स्थान पटकावलं आहे. तर भारताचा रवी बिश्नोई आता तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.