Jagdeep Dhankhar On Human Rights : मानवाधिकाराच्या बाबतीत भारत जगासाठी आदर्श – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

Jagdeep Dhankhar On Human Rights : मानवाधिकारांच्या बाबतीत जगातील कोणताही भाग इतका समृद्ध नाही, जितका आपला देश मानवाधिकारांनी समृद्ध झालेला आहे, असे जगदीप धनखड म्हणाले.

139
Jagdeep Dhankhar On Human Rights : मानवाधिकाराच्या बाबतीत भारत जगासाठी आदर्श - उपराष्ट्रपती जगदीप धनखड
Jagdeep Dhankhar On Human Rights : मानवाधिकाराच्या बाबतीत भारत जगासाठी आदर्श - उपराष्ट्रपती जगदीप धनखड

जगातील 1/6 लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये मानवाधिकारांना (human rights) चालना देण्यात होत असलेले सकारात्मक बदल उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी अधोरेखित केले. मानव अधिकारांच्या बाबतीत भारताने जगासमोर ‘आदर्श ‘ म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे, असेही ते या वेळी म्हणाले. मानवाधिकारांच्या बाबतीत जगातील कोणताही भाग इतका समृद्ध नाही, जितका आपला देश मानवाधिकारांनी समृद्ध झालेला आहे”, असेही त्यांनी नमूद केले. (Jagdeep Dhankhar On Human Rights)

(हेही वाचा – मातृभूमीविषयी अत्युत्कट प्रेम व्यक्त करणारं ‘ने मजसी ने परत मातृभूमीला…’)

मानवी हक्कांना प्रोत्साहन देण्यात भारत आदर्श

आज भारत मंडपम (Bharat Mandapam) येथे मानवाधिकार दिनाच्या (Human Rights Day) समारंभात बीजभाषण करताना उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले की, “प्रामुख्याने मानवी हक्क आणि मूल्यांना एवढे महत्व प्राप्त झाल्यामुळेच आपला अमृत-काळ हा आपल्यासाठी गौरव-काळ बनला आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, “आपली सांस्कृतिक मूल्ये आणि संवैधानिक वचनबद्धता आपल्याला मानवी हक्कांचा आदर, संरक्षण आणि संवर्धन करण्याप्रती आपली कटीबद्धता प्रतिबिंबित करते, जी आपल्या डीएनएमध्येच आहे”. “मानवी हक्कांना प्रोत्साहन, संवर्धन आणि समृद्ध करण्यात भारत जगासमोर एक आदर्श उदाहरण आहे”, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.

मानवी मन आणि मानवी संसाधनांचे सक्षमीकरण गरजेचे

राजकारणात अलीकडच्या काळात मोफत भेटवस्तू देण्याची प्रवृत्ती वाढत आहे, याविषयी बोलतांना उपराष्ट्रपतींनी सावध केले की, यामुळे खर्चाच्या प्राधान्याचा विपर्यास होईल आणि आर्थिक स्थिरतेच्या मूलभूत संरचनेलाच बाधा पोहोचेल, “वित्तीय अनुदानांच्या माध्यमातून केवळ समूहाचे सक्षमीकरण होते आणि त्यामुळे केवळ अवलंबित्व वाढते” म्हणून मानवी मन आणि मानवी संसाधनांचे सक्षमीकरण (human resources empowerment) होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

(हेही वाचा – Narendra Modi: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, पाक तज्ज्ञांनी सांगितले या यशामागचे कारण…वाचा सविस्तर)

भ्रष्टाचार आणि मानवी हक्क एकत्र राहू शकत नाहीत

विशेषत: दुर्लक्षित घटकांच्या मानवी हक्कांच्या संवर्धनासाठी पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाचा ‘गेम-चेंजर’ म्हणून उल्लेख करून उपराष्ट्रपतींनी नमूद केले की, सेवा वितरणात तंत्रज्ञानाच्या वापराने देखील ही प्रगती आणखी मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. (Jagdeep Dhankhar On Human Rights)

आपल्या भाषणात उपराष्ट्रपती (Vice President) यांनी सावध करत सांगितले की, “मानवी हक्कांना सर्वांत मोठा धोका भ्रष्टाचारातून उद्भवतो.”

या कार्यक्रमादरम्यान, उपराष्ट्रपतींनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (National Human Rights Commission) ‘मानव अधिकार नई दिशाएं’ या वार्षिक हिंदी जर्नलचे तसेच एनएचआरसी वार्षिक इंग्रजी जर्नल आणि फॉरेन्सिक सायन्स अँड ह्युमन राइट्स (Forensic Science and Human Rights) या आयोगाच्या पुस्तकांचे प्रकाशनही केले. (Jagdeep Dhankhar On Human Rights)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.