Narendra Modi: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, पाक तज्ज्ञांनी सांगितले या यशामागचे कारण…वाचा सविस्तर

भारतासाठी यशस्वी ठरलेल्या ३ गोष्टींवरही भाष्य केले.

239
Narendra Modi: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, पाक तज्ज्ञांनी सांगितले या यशामागचे कारण...वाचा सविस्तर
Narendra Modi: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, पाक तज्ज्ञांनी सांगितले या यशामागचे कारण...वाचा सविस्तर

भारतात ५ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. यातच आता अमेरिकास्थित पाकिस्तानी वंशाचे व्यापारी तसेच राजकीय तज्ज्ञ साजिद तरार यांनीही भाजपच्या या विजयासंदर्भात मोठी प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारताच्या यशामागचं मुख्य कारण सांगितलं आहे.

पाकिस्तानी जर्नलिस्ट कमर चीमाच्या शोमध्ये साजिद तरारा यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत टॉप ५ ग्लोबल पॉवर्समध्ये समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होतील. देशातील राजकारणावर त्यांची जबरदस्त पकड आहे, तर विरोधक असंघटित असून त्यांच्याकडे असा कुठलाही नेता नाही, जो पंतप्रधान मोदिंना आव्हान देऊ शकेल. याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदींनाच जाते. त्यांनी स्वत:च्या बळावर भारताला पुढच्या रांगेत पोहोचवले आहे.’

(हेही वाचा – NIA: साकीब नाचनचे खलिस्तानी दहशतवादी आणि आयएसआयशी थेट संबंध )

पुढे तरार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि लवकरच टॉप ३ मध्येही होईल. यावेळी त्यांनी भारतासाठी यशस्वी ठरलेल्या ३ गोष्टींवरही भाष्य केले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यशस्वी परराष्ट्र दौरे, चंद्रयान आणि ग्लोबल साऊथची प्रगती, हे सर्व भारताला एक मजबूत जागतिक शक्ती म्हणून पुढे नेत आहे.’

भारताच्या यशामागचं गमक…
भारताच्या यशामागचं गमक सांगताना तरार म्हणतात की, भारताच्या प्रगतीचे सर्वात मोठे कारण म्हणजे पंतप्रधान मोदींसारखा राष्ट्रवादी नेता. ते या देशाचे नेतृत्व करत आहेत आणि भविष्यातही तेच नेतृत्व करतील. एवढेच, नाही तर यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या एका वक्तव्याकडेही लक्ष आकर्षित केले. भारत क्षेत्रीय शक्तीपेक्षाही जास्त पुढे गेला आहे तसेच भारताच्या यशामागचं गमक हे गंभीर शासन आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.