Corona Patient: थंडीत कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, आरोग्य मंत्रालयाकडून सावधानतेचा इशारा

चीनचे वैज्ञानिक या नव्या न्यूमोनियावर संशोधन करत आहेत.

231
Corona Patient: थंडीत कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, आरोग्य मंत्रालयाकडून सावधानतेचा इशारा
Corona Patient: थंडीत कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, आरोग्य मंत्रालयाकडून सावधानतेचा इशारा

कोरोना महामारी (Corona Patient) संपुष्टात आली आहे, असे वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा आपले डोके वर काढण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. पुन्हा एकदा भारतात कोरोना विषाणुचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. सध्या देशातील सर्व रुग्णालयांमध्ये मिळून ८०८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत तसेच धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या २४ तासांत १४८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या माहितीमुळे भारतातील नागरिकांची चिंता वाढणार आहे.

चिनमध्ये सध्या न्यूमोनियासदृश नवीन व्हेरिएंट आढळल्याने तेथील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तिथल्या अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना हा न्यूमोनिया झाला असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. चीनचे वैज्ञानिक या नव्या न्यूमोनियावर संशोधन करत असताना हिंदुस्थानात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भारतातील आरोग्य मंत्रालय सतर्क झाले असले , तरी हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे, मात्र लोकांना सावध राहण्याचा सल्लाही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

(हेही वाचा – Jagdeep Dhankhar On Human Rights : मानवाधिकाराच्या बाबतीत भारत जगासाठी आदर्श – उपराष्ट्रपती जगदीप धनखड)

रुग्णांची संख्या वाढली…
गेल्या वर्षी हिवाळ्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढली होती. यावर्षीही डिसेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. आरोग्य विभागाचे या वाढत्या आकडेवारीवर लक्ष आहे तसेच कोणीही चिंता करू नये, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.