J.J. Bridge Beatification : जे.जे उड्डाण पुलाखाली भाजप आणि काँग्रेस आमदार एकत्र

जे. जे. पुलाच्या खालील भागाच्या सुशोभीकरणवर नार्वेकर आणि पटेल यांचे एकमत

480
J.J. Bridge Beatification : जे.जे उड्डाण पुलाखाली भाजप आणि काँग्रेस आमदार एकत्र
J.J. Bridge Beatification : जे.जे उड्डाण पुलाखाली भाजप आणि काँग्रेस आमदार एकत्र

भारतीय जनता पक्ष (BJP)आणि काँग्रेस (Congress) यांच्या मेतकूट काही जमत नसलं तरीही दक्षिण मुंबईत मात्र भाजप आणि काँग्रेस यांच्या आमदारांचे  सुर जुळून  येत असल्याचे पाहायला  मिळत आहेत.  निमित्त आहे जे.जे उड्डाणपुरा(J.J. Bridge Beatification) खाली सुशोभीकरणाचे. कुलाबा विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)आणि काँग्रेस पक्षाचे मुंबादेवी विधानसभा मतदार संघाचे आमदार अमीन पटेल (Amin Patel) हे जे. जे उड्डाणपुलाखालील(J.J. Bridge Beatification)  जागेतील सुशोभीकरणाचे काम एकत्र येऊन  करत असल्याचे समोर आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar)  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत  काँग्रेस आमदार अमिन पटेल(Amin patel)  यांनी निश्चित  केलेल्या कामात काही बदल सुचविले.  त्यानुषंगाने, त्या कामांना नवीन आराखडा  बनवून त्याला अंतिम रूप दिले गेल्याची माहिती समोर आली आहे.(J.J. Bridge Beatification)

(हेही वाचा- Mahaculture Festival : मुंबई शहर जिल्ह्यात 22 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सव )

सुशोभीकरण होतेय एकाच विचाराने

मुंबई महापालिकेच्या ए. बी आणि ई विभागातील मकदूमशाह माहिमी अर्थात जे.जे. उड्डाणपुलाखालील(J.J. Bridge Beatification) जागेचे सुशोभिकरण व विकास काम करणेच्या मुद्द्यावर भाजप आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul narvekar) व मुंबादेवी विधानसभेचे आमदार अमिन पटेल(Amin patel) हे एकत्र एका विचाराने या भागाचा विकास करण्याचा निर्णय घेत  प्रशासनाला  मूळ  आराखड्यात सुधारणा  करून नवीन आराखड्यानुसार  काम  करण्यास भाग पाडले आहे.

शहर जिल्हा नियोजन समितीचा निधी उपलब्ध

त्याचे झाले असे की, मुंबई महापालिकेच्या बी विभागातील विविध पदपथ, वाहतुक बेट, उड्डाणपूला खालील मोकळ्या जागेचे सुशोभिकरण आदी कामे करण्याबाबत सूचना आयुक्तांकडून प्राप्त  झाल्यानंतर बी विभागाने या जे. जे. उड्डाणपूलाखाली(J.J. Bridge Beatification) सुशोभिकरण व विकास कामे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ए, बी आणि ई विभागातील मकदुमशाह माहिमी उड्डाणपुलाखालील (जे. जे. उड्डाण पूल) जागेचे सुशोभिकरण व विकास काम करणेकरीता  यूडीएआय कन्सल्टंट्स यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.  या  यूडीएआय कन्सल्टंट्स यांच्यात झालेल्या बैठकीत शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन समिति अंतर्गत निधी उपलब्ध करुन हे काम  करण्याकरीता सहमती दर्शविली.(J.J. Bridge Beatification)

(हेही वाचा- Onion Export : कांदा निर्यात बंदीवरून सर्व संघटना एकत्र, होणार मोठे आंदोलन )

अमिन पटेल यांनी सूचवले कामांमध्ये बदल

 त्यानुसार मार्च २०२३ मध्ये  प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती. परंतु  ऑक्टोबर २०२३ मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत  काँग्रेस आमदार अमिन पटेल(Amin patel)  यांनी या पुलाखाली सुशोभीकरण कामात काही बदल सुचविले. त्या अनुषंगाने त्याला अंतिम रूप दिले गेले.त्यानुसार आता या जे जे उड्डाणपुलाखालील(J.J. Bridge Beatification) भागाचे सुशोभीकरण केले जात आहे. त्यामुळे जे जे च्या पुलाखालील भाग बकाल अवस्थेत पडून आले तो भाग आता वाहतूक कोंडीमुळे रस्त्यात वाहनांमध्ये अडकून पडला तरी या पुलाखालील सुशोभीकरण हे मनाला सुखद धक्का देणारे ठरणार आहे.(J.J. Bridge Beatification)

महापालिकेचा ५० टक्के निधी होणार खर्च

या सुशोभिकरणाच्या कामासाठी यूडीएआय कन्सल्टंट्स यांनी सुधारित आराखडा बनवला असून यासाठी  विविध करांसहित सुमारे १३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यापैकी ६.५६ कोटी रुपये हे  मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या सुशोभीकरणाच्या कामासाठी पुश्पम इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीची निवड करण्यात आली आहे.(J.J. Bridge Beatification)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.