Mahaculture Festival : मुंबई शहर जिल्ह्यात 22 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सव

महोत्सवात विविध प्रदर्शन दालने, रंगमंचावरील सांस्कृतीक कार्यक्रम व मर्दानी खेळ असणार आहेत. 

141
Mahaculture Festival : मुंबई शहर जिल्ह्यात 22 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सव
Mahaculture Festival : मुंबई शहर जिल्ह्यात 22 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सव

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्यावतीने महासंस्कृती महोत्सव 2024(Mahaculture Festival)चे आयोजन काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदान येथे 22 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले  आहे. गुरुवारदिनांक 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता या महोत्सवाचे(Mahaculture Festival) उद्घाटन होणार आहे. सलग पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार असून सर्वांनी या महोत्सवातील कार्यक्रमांचा आनंद घ्यावाअसे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.(Mahaculture Festival)

सांस्कृतिक(Mahaculture Festival) कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल  आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.(Mahaculture Festival)

(हेही वाचा- Atul Save : घरकुल योजनांच्या कामांना गती द्या-मंत्री अतूल सावे )

 महोत्सवात(Mahaculture Festival) विविध प्रदर्शन दालनेरंगमंचावरील सांस्कृतीक कार्यक्रम व मर्दानी खेळ असणार आहेत.  प्रदर्शन दालनात शिवकालीन शस्त्रेनाणी व हस्तलिखितेशिवसंस्कार काव्य दालनस्वराज्य ते साम्राज्य या आर्ट गॅलरीचा समावेश करण्यात आला आहे.(Mahaculture Festival)

 महोत्सवाच्या उद्घाटन(Mahaculture Festival) सत्रात नृत्यवंदना कार्यक्रम होणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी 7 वाजता जल्लोष या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता लेझीम व मर्दानी खेळतर सायंकाळी 7.00 वाजता मराठी लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.00 वाजता मल्लखांबसायं. 5.00 वाजता शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सव(Mahaculture Festival)सायंकाळी 7 वाजता सप्तरंग या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता दशावतार या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी 7.00 वाजता शिववंदना हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.00 वाजता पारंपरिक नृत्य व मर्दानी खेळ तर सायंकाळी 7.00 वाजता मराठी बाणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.(Mahaculture Festival)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.