Onion Export : कांदा निर्यात बंदीवरून सर्व संघटना एकत्र, होणार मोठे आंदोलन

Onion Export : तीन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीमध्ये कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची घोषणा करण्यात आली. परंतु तातडीने मंगळवारी केंद्रीय ग्राहक सचिव यांनी कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही अशी माहिती दिली.

142
Onion Export : कांदा निर्यात बंदीवरून सर्व संघटना एकत्र, होणार मोठे आंदोलन
Onion Export : कांदा निर्यात बंदीवरून सर्व संघटना एकत्र, होणार मोठे आंदोलन

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय नाशिकपासून सुरु करण्याचा निर्णय सर्व कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कांद्याच्या प्रश्नावरून संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा नाशिक मधूनच आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. (Onion Export)

तीन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीमध्ये कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची घोषणा करण्यात आली. परंतु तातडीने मंगळवारी केंद्रीय ग्राहक सचिव यांनी कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही अशी माहिती दिली. त्यामुळे आता सरकारच्या या धडसोडच्या वृत्तीमुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

(हेही वाचा – Supreme Court : लग्न झाले म्हणून महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढले; काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय)

आज लासलगाव बाजार समितीच्या (Lasalgaon Market Committee) मुख्य इमारतीच्या बैठक हॉलमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना, छावा क्रांती संघटना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यासह इतर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाल्या.

या बैठकीत केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक संपन्न झाली. केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तातडीने निर्यात बंदी न हटवल्यास येणाऱ्या दिवसांमध्ये राज्यव्यापी मोठे असे तीव्र आंदोलन करणार असल्याचे निश्चित झाले.

नाशिक आणि कांदा आंदोलनाचा इतिहास

नाशिक मध्ये सर्वसाधारण 35 वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी (Sharad Joshi) यांनी याच कांद्यावरून तत्कालीन केंद्रीय सरकारला जोरदार आंदोलन करून आपले निर्णय बदलायला भाग पाडले होते. त्यावेळी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनाला संपूर्ण राज्यासह देशांमध्ये शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर शरद जोशींचे हे आंदोलन आजही अनेकांच्या स्मरणात आहे

आता पुन्हा तशीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यामध्ये झाली आहे. पुन्हा एकदा सर्व शेतकरी संघटना एकत्र झाले असून त्यांची ही बैठक अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

(हेही वाचा – Farmers Protest : शंभू सीमेवर शेतकरी आक्रमक; १२०० ट्रॅक्टर्स घेऊन दिल्लीत घुसण्यासाठी पोलिसांवर दबाव)

कांदा निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत कायम

तीन दिवसांपूर्वीच कांदा निर्यात बंदी उठवल्याची बातमी आली होती. भाजपच्या (BJP) केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, सुजय विखे पाटील यांनी कांदा निर्यात बंदी उठवल्याबद्दल श्रेय घेण्यासाठी स्तुतीचा गुलाल उधळला होता. स्वतःचाच हात लांब करून स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. परंतु तो गुलाल जमिनीवर पडण्याआधीच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत कायम आहे. असे स्पष्टीकरण दिले आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम केले. केंद्र सरकार (Central Govt) मतदारांना डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांचा बळी देण्याचे काम करत आहे. त्याविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. शेतकऱ्यांना सतत फसवत असणाऱ्या त्यांच्या भावनांचा खेळ मांडणाऱ्या या सरकारला निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागेल. (Onion Export)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.