Kalyan Station : कल्याण रेल्वे स्थानकात सापडले स्फोटके, घातपाताचा धोका टळला

269
Kalyan Station : कल्याण रेल्वे स्थानकात सापडले स्फोटके, घातपाताचा धोका टळला
Kalyan Station : कल्याण रेल्वे स्थानकात सापडले स्फोटके, घातपाताचा धोका टळला

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण रेल्वे स्थानकात (Electronic Detonators) बुधवारी दुपारी स्फोटकांचा साठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी ही स्फोटके ताब्यात घेतली असून ही स्फोटके या ठिकाणी कोणी ठेवली, याचा शोध घेण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत असल्याची माहिती रेल्वे पोलीस उपायुक्त मनोज पाटील (GRP Dcp Manoj Patil) यांनी दिली.

(हेही वाचा – Buldhana: बुलढाण्यातल्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओचं सत्य; दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं… वाचा नक्की काय घडले?)

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या स्फोटकांमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर ( Electronic Detonators) आहेत. ही डिटोनेटर स्फोट घडवून आणण्याच्या कामी उपयोगी पडतात; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकात डिटोनेटर कोणी ठेवले, याचा शोध घेण्यासाठी कल्याण रेल्वे पोलीस आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पाटील यांनी दिली.

कल्याण परिसरातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात डिटोनेटर्स जप्त करण्यात आले आहेत. रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी, स्थानिक पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाचे जवान घटनास्थळी पोहोचले. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर (Electronic Detonators) आहेत, ज्यांचा वापर स्फोट घडविण्यासाठी आणि खदाणीत स्फोट घडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

कल्याण रेल्वे स्थानकाच्या बाहेर एका निर्जन ठिकाणी ५४ डिटोनेटर्स असलेली पिशवी बुधवारी दुपारी एका सफाई कर्मचारी यांना आढळून आली. (Electronic Detonators) ही माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी रेल्वे पोलीस, श्वान पथके (Dog Squad) आणि बॉम्ब निकामी पथक (BDS) आणि रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) अधिकारी यांनी धाव घेतली. कल्याण रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या परिसरात ही बाब उघडकीस येताच रेल्वे पोलीस, स्थानिक पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, हे इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर (Electronic Detonators) आहेत; ज्याचा उपयोग खदान खोदण्यासाठी केला जातो. हे डिटोनेटर्स या ठिकाणी कसे पोहोचले, याचा शोध पोलीस घेत आहेत.हे डिटोनेटर्स या ठिकाणी मुद्दाम कोणी ठेवले की, कोण विसरून गेले याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून रेल्वे स्टेशन आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत. (Kalyan Station)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.