Israel Embassy Blast Case: इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाचे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडे हस्तांतरित

प्राथमिक निरीक्षण अहवाल दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडे सादर करण्यात आला आहे.

103
Israel Embassy Blast Case: इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाचे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडे हस्तांतरित
Israel Embassy Blast Case: इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाचे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडे हस्तांतरित

इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाचे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडे (Israel Embassy Blast Case) हस्तांतरित करण्यात आले आहे. या घटनेसंदर्भातील पुढील चौकशी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून केली जाईल. नवी दिल्लीतील तुघलक रोड पोलीस स्थानकात या घटनेबाबत एफआयआर नोंदवण्यात करण्यात आला आहे. या घटनेचा प्राथमिक निरीक्षण अहवाल दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडे सादर करण्यात आला आहे.

दिल्लीतील इस्रायली दुतावासाजवळ दिल्ली एनसीआरमध्ये झालेल्या स्फोटात देशी बनावटीच्या बॉम्बने हल्ला करण्यात आला. ही घटना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रोडवरील २ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली.

(हेही वाचा – Chief Secretary Maharashtra : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर; पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता कार्यभार सांभाळणार विवेक फणसळकर)

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये स्फोट झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या झाडाझुडपातून काडतुसे जप्त केली आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने या घटनेबाबत सांगितले की, या स्फोटात देशी बॉम्बचा वापर करण्यात आला. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणावरील गवत काढून एक खड्डा तयार करण्यात आला. तेथे असलेल्या विशेष कक्षाच्या अधिकाऱ्यांना फटाक्यांसारखा वास येत असल्याची माहिती दिली तसेच या स्फोटावेळी निळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलेली एक संशयित व्यक्ती आढळल्याची माहितीही दिली आहे. ही संशयित व्यक्ती स्फोट झाल्यानंतर सुमारे २ तासांनी रिक्षाने घटनास्थळी पोहोचली होती. रिक्षातून उतरल्यानंतर तो स्फोट झालेल्या ठिकाणी गेला आणि ५ मिनिटांनंतर तो पुन्हा दुसऱ्या रिक्षात बसून निघून गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित जामिया नगरहून रिक्षामध्ये बसला होता. रिक्षाच्या दोन्ही वाहनचालकांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.