Indian Navy : भारतीय नौदलाने अरबी समुद्रात वाढवली गस्त; काय आहे कारण ?

Indian Navy : विनाशक क्षेपणास्त्रे आणि आणि लढाऊ जहाजांचा समावेश असलेले कृतीदल सागरी सुरक्षा कार्य करण्यासाठी आणि कोणतीही घटना घडल्यास व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.

183
Indian Navy : भारतीय नौदलाने अरबी समुद्रात वाढवली गस्त; काय आहे कारण ?
Indian Navy : भारतीय नौदलाने अरबी समुद्रात वाढवली गस्त; काय आहे कारण ?

गेल्या काही आठवड्यांमध्ये लाल समुद्र, एडनचे आखात आणि मध्य/उत्तर अरबी समुद्रातील (Arabian Sea) आंतरराष्ट्रीय नौवहन मार्गाद्वारे प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांच्या सागरी सुरक्षा संबंधित घटनांमध्ये वाढ झाली आहे. भारतीय सागरी किनार्‍यापासून (Indian Ocean Coast) अंदाजे 700 नॉटिकल मैल अंतरावर एमव्ही रुएन या व्यापारी जहाजावर चाचेगिरीची घटना झाली होती. पोरबंदरच्या दक्षिण-पश्चिम 220 नॉटिकल मैलांवर चेम प्लूटो (MV Chem Pluto) या व्यापारी जहाजावर अलीकडेच ड्रोन हल्ला झाला होता. भारताच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन (Exclusive Economic Zone) (EEZ) जवळील सागरी घटनांमध्ये बदल झाला आहे, हेच या घटनांतून दिसून येते.

(हेही वाचा – Nitesh Rane: नितेश राणेंचा कोकणातील पाणबुडी प्रकल्पावरून हल्लाबोल, विरोधक कोणतीही माहिती न घेता भुंकत असल्याची टीका)

या घटनांना प्रतिसाद म्हणून भारतीय नौदलाने मध्य/उत्तर अरबी समुद्रात (Arabian Sea) सागरी गस्त ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये भरीव वाढ केली आहे आणि सैन्याची कुमक वाढवली आहे. विनाशक क्षेपणास्त्रे आणि आणि लढाऊ जहाजांचा समावेश असलेले कृतीदल सागरी सुरक्षा कार्य करण्यासाठी आणि कोणतीही घटना घडल्यास व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.

संपूर्ण सागरी क्षेत्रात जागरूकता ठेवण्यासाठी लांब पल्ल्याची सागरी गस्ती विमाने आणि रिमोटली पायलेटेड एयरक्राफ्ट (Remotely piloted aircraft) माध्यमातून हवाई देखरेख वाढवण्यात आली आहे. भारतीय एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन क्षेत्रात देखरेख ठेवण्याच्या उद्देशाने भारतीय नौदल तटरक्षक दलासोबत (Indian Coast Guard) समन्वयाने कार्य करत आहे.

(हेही वाचा – Chief Secretary Maharashtra : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर; पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता कार्यभार सांभाळणार विवेक फणसळकर)

राष्ट्रीय सागरी संस्थांच्या (National Maritime Organizations) समन्वयाने भारतीय नौदलाकडून एकूण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. भारतीय नौदल या प्रदेशातील व्यापारी जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. (Indian Navy)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.