Nitesh Rane: नितेश राणेंचा कोकणातील पाणबुडी प्रकल्पावरून हल्लाबोल, विरोधक कोणतीही माहिती न घेता भुंकत असल्याची टीका

महाविकास आघाडी सरकारच्या काळात दुर्लक्षित झालेला प्रकल्प हा महायुती सरकार पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

172
Nitesh Rane: नितेश राणेंचा कोकणातील पाणबुडी प्रकल्पावरून हल्लाबोल, विरोधक कोणतीही माहिती न घेता भुंकत असल्याची टीका
Nitesh Rane: नितेश राणेंचा कोकणातील पाणबुडी प्रकल्पावरून हल्लाबोल, विरोधक कोणतीही माहिती न घेता भुंकत असल्याची टीका

सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प कुठेच जाणार नसल्याचे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी स्पष्ट केले आहे. विरोधक कोणतीही माहिती न घेता भुंकत असल्याची टीका करत ते म्हणाले की, गुजरात आणि केरळमध्ये पाणबुडी प्रकल्प सुरू झाला, पण आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात अजून जैसे थे अशीच आहे. राज्यातला पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या काळात दुर्लक्षित झालेला प्रकल्प हा महायुती सरकार पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार नितेश राणे भूमिका मांडताना म्हणाले की, काही दिवसांपासून सिंधुदुर्गमध्ये होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाच्या बाबतीत उलटसुलट बातम्या येत आहेत. कुठलीही माहिती न घेता वैयक्तिक दोषापोटी भुंकण्याचं काम विरोधक करतात. सिंधुदुर्ग पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार नाही, पण महाराष्ट्रात असलेल्या पाणबुडी प्रकल्पासारखाच एक प्रकल्प गुजरात आणि केरळमध्येदेखील होणार आहे. त्यामुळे कुणीही हा प्रकल्प पळवलेला नाही.

(हेही वाचा – Ram Mandir: 600 किलोमीटर दंडावत यात्रेतून 3 भाविक अयोध्येत दाखल, रोमांचकारी प्रवास वर्णन वाचून आश्चर्यचकित व्हाल !)

आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात अजून जैसे थे च…

ते पुढे म्हणाले की, “२०१८ च्या जवळपास दीपक केसरकर यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली होती. परंतू, महाविकास आघाडी सरकारच्या काळात असलेल्या पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी याला कुठलीही चालना दिली नाही. हा प्रकल्प बंद कसा पडेल यावर त्यांनी जास्त जोर दिला. त्यामुळेच रविवारी गुजरात आणि केरळमध्ये हा प्रकल्प सुरू झाला पण आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात अजून जैसे थे च आहे. तरीही आमचं महायुती सरकार हा पाणबुडी प्रकल्प पूर्ण करेल आणि देशात एक आदर्श प्रकल्प म्हणून नाव कमवेल,” अशी ग्वाही नितेश राणेंनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.