IRCTC Down : तांत्रिक अडचणींमुळे आयआरसीटीसीची सेवा खंडित

166
IRCTC Down : तांत्रिक अडचणींमुळे आयआरसीटीसीची सेवा खंडित

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. आज म्हणजेच मंगळवार २५ जुलै सकाळपासूनच ऑनलाईन (IRCTC Down) रेल्वे तिकीट ॲप आणि संकेतस्थळ आयआरसीटीसी (IRCTC) बंद पडले आहे. आयआरसीटीसीचे संकेतस्थळ आणि अ‍ॅपवरून प्रवाशांना तिकीट बुकिंग आणि पेमेंटमध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीकडून (IRCTC Down) एका ट्विटमध्ये सांगण्यात आले की, तांत्रिक कारणांमुळे तिकीट सेवा उपलब्ध नाही. आमची तांत्रिक टीम समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे. समस्येचे निराकरण होताच, आम्ही त्याबद्दल माहिती देऊ.

(हेही वाचा – राज्यात आतापर्यंत १ कोटी ११ लाख शेतकऱ्यांनी भरला एक रुपयात पीकविमा)

तसेच तांत्रिक समस्या ही फक्त ॲप आणि वेबसाइटवर (IRCTC Down) येत आहे. तथापि, बुकिंगसाठी तुम्ही ‘आस्क दिशा’ Ask Disha हा पर्याय निवडू शकता. तसेच, तुमच्या IRCTC ई-वॉलेटमध्ये पैसे असल्यास तिथूनही तुम्हाला तिकिटे बुक करता येतील. तर शक्य असल्यास तुम्ही रेल्वे स्टेशनवरील काउंटरवरून तिकीट बुक करू शकता. IRCTC च्या प्रवक्त्याने सांगितले की, काल रात्रीपासून साइट बंद असून ती कार्यान्वित करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आयआरसीटीसीने (IRCTC Down) प्रवाशांना पेमेंटसाठी वॉलेट वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बुकिंगसाठी Ask Disha पर्याय निवडण्यास सांगितले आहे. परंतू ‘आस्क दिशा’वरही अडचणी येत असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांकडून करण्यात येत आहेत आणि पैसे खात्यातून वजा होऊनही तिकीट बुक होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणेणे आहे. यासंदर्भात अनेक प्रवाशांनी त्यांचे पैसे कापले गेल्याचे स्क्रिनशॉट देखील शेअर केले आहेत.

रेल्वेचे तिकीट बुकिंग कुठून कराल?

दरम्यान, जर तुम्ही IRCTC वर ऑनलाईन तिकीट बुक करू शकत नसाल तर घाबरण्याचे कारण नाही. बुकिंगसाठी तुम्ही ‘आस्क दिशा’ पर्याय निवडू शकता. याशिवाय तुमच्या IRCTC ई-वॉलेटमध्ये पैसे असतील तर तिथून तिकीट बुकिंगही करता येईल. तसेच तुम्ही रेल्वे स्टेशनवरील काउंटरवरून तिकीट बुक करू शकता. आयआरसीटीसीने म्हटले की, पर्यायाने ॲमेझॉन, Makemytrip इत्यादी सारख्या B2C प्लॅटफॉर्मवरून देखील तुम्ही तिकिटे बुक करता येऊ शकता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.