ठाकरे सरकारच्या काळात पालकमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान होते महापालिकेच्या बंगल्यात

210
ठाकरे सरकारच्या काळात पालक मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान होते महापालिकेच्या बंगल्यात
ठाकरे सरकारच्या काळात पालक मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान होते महापालिकेच्या बंगल्यात

मुंबई महापालिका मुख्यालयात उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना कार्यालय देण्यात आल्याने विरोधकांकडून प्रचंड टीका होत आहे. परंतु याच विरोधकांच्या मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात शहराचे पालकमंत्री असलेल्या अस्लम शेख यांना महापालिका अतिरिक्त आयुक्त यांना मलबार हिल मधील निवासस्थान देण्यात आले होते. मंत्र्यांना महापालिका निवासस्थान देण्याची कोणतीही तरतुद नसताना शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांना ठाकरे सरकारने मलबार हिल मधील बंगला उपलब्ध करून दिला होता. आणि या बंगल्यात पालकमंत्री रहात होते. त्यामुळे लोढा महापालिका मुख्यालयात कार्यालय देण्यावरून आकांड तांडव करणाऱ्या विरोधकांनी तेव्हा पालकमंत्री महोदयांना यांना मलबार मधील बंगला कोणत्या नियमानुसार दिला होता असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई महापालिकेच्या कारभारावर आता प्रत्यक्षपणे पालकमंत्र्यांचा प्रभाव दिसून येत असतानाच त्या मंत्र्यांना थेट महापालिका मुख्यालयातच कार्यालय उपलब्ध करून दिले गेले आहे. उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी महापालिका मुख्यालयात बाजार व उद्यान समिती अध्यक्षांचे कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. लोढा यांना कार्यालय दिल्यानंतर विरोधी पक्षातील आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह सर्वांनी जोरदार टीका केली. यावर महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना दिलेल्या दालनाबाबत स्पष्टीकरण देताना लोढा यांनी पंधरा दिवसांपूर्वी अशा प्रकारचे पत्र दिले होते की, त्यांना मुंबई महानगरपालिकेत त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कार्यालय हवे आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शासन आपल्या दारी उपक्रम राज्यभरात राबवत आहेत त्यामुळे मुंबईतील प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री म्हणून त्यांनी ही मागणी केली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी मुंबई महापालिकेतच मुंबईतील नागरिकांचे प्रश्न त्यांनी सोडवता येतील याचा विचार करून पत्र लिहिले असल्याचे आम्हाला सांगितले. त्यामुळे आम्ही पत्राला सकारात्मक प्रतिसाद दाखवत त्यांना हे दालन दिल्याचे आणि दुसऱ्या पालकमंत्र्यांनीही जर मागणी केली तर त्यांनाही आम्ही दालन उपलब्ध करून देऊ असे सांगितले. मात्र, एका बाजूला विरोधक पालकमंत्री यांना दिलेल्या महापालिका मुख्यालयात दिलेल्या दालनावरून टीका करत असले तरी यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन शहराचे पालकमंत्री व मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांना महापालिका जल अभियंता यांच्या ताब्यातील अतिरिक्त आयुक्त हे वापरत असलेला बंगला देण्यात आला होता. अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे आणि प्रवीण दराडे यांना देण्यात आला होता.

(हेही वाचा – IRCTC Down : तांत्रिक अडचणींमुळे आयआरसीटीसीची सेवा खंडित)

२ जानेवारी २०१५ मध्ये जलाभियंता यांच्या ताब्यातील ४८३० चौरस फुटांचा हा एक क्रमांकाचा बंगला दराडे दाम्पत्याने रिकामी करून दिल्यावर मागील महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी या बंगल्याची मागणी केली. त्यानुसार ठाकरे सरकारने महापालिकेला कळवून हा बंगला तत्कालीन शहराचे पालकमंत्री म्हणून शेख यांना वितरित करण्याचे निर्देश दिले. तेव्हा पासून मंत्रिपद जाईपर्यंत शेख हे या बंगल्यात राहत होते. महाविकास आघाडीच्या काळामध्ये महापालिका अस्तित्वात असताना पालक मंत्र्यांनी पालकमत्र्यांनी जल अभियंता विभागाच्या ताब्यात असलेला हा बंगला स्वतःसाठी वापरला. महापालिकेचा बंगला मंत्री महोदयांनी वापरण्याची ही पहिलीच घटना होती. मुळात हा बंगला जल अभियंता यांच्यासाठी होता. पण या बंगल्यावर सनदी अधिकाऱ्यांची नजर पडताच येणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांनी तिथेच राहणे पसंद केले. तेव्हापासून या बंगल्याचा वापर अतिरिक्त आयुक्तांकडून केला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या काळात पालक मंत्र्यांना महापालिकेचा बंगला देणाऱ्या ठाकरे सरकारमधील घटक पक्ष असलेल्या आणि आत्ताच्या विरोधी पक्षाचा पालकमंत्री यांना मुख्यलयात एक कार्यालय देण्यास एवढा विरोध का असा सवाल आता उपस्थित होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.