Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मविआ सरकार सोडून भाजपासोबत जायचे होते; पण…; तटकरेंचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे दिल्लीवरून मुंबईत परतले तेव्हा ते मविआ सरकार बरखास्त करून भाजपासोबत जाऊन युतीचे सरकार स्थापन करण्याच्या निर्णयापर्यंत आले होते, असे तटकरे म्हणाले.

105

मविआचे सरकार असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे २०२१ मध्ये दिल्ली दौऱ्यावर गेले होते, तिथे त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत भेट झाल्यानंतर त्यांनी भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र संजय राऊत यांनी त्यांना या निर्णयापासून परावृत्त केले, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते सुनील तटकरे यांनी एका  वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना केला.

(हेही वाचा Dhule : धुळ्यात वंचितला फटका; आता दुहेरी लढत होणार)

काय म्हणाले सुनील तटकरे? 

जेव्हा उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) दिल्लीवरून मुंबईत परतले तेव्हा ते मविआ सरकार बरखास्त करून भाजपासोबत जाऊन युतीचे सरकार स्थापन करण्याच्या निर्णयापर्यंत आले होते. तशी चर्चा त्यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांशी चर्चाही केली होती. उद्धव ठाकरे याविषयी स्वतः एकनाथ शिंदे यांच्याशीही बोलले होते. मात्र संजय राऊत यांना हे नको होते, म्हणून त्यांनी वांद्र्यात एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये मविआच्या नेत्यांची बैठक घेतली आणि तिथे त्यांनी ‘उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ही भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन करण्याच्या विचारात आहेत, मात्र आपल्या सर्वाना उद्धव ठाकरे यांना त्यांच्या या विचारापासून दूर करायचे आहे, असे म्हणाले, अशी माहिती तटकरे यांनी दिली. सुनील तटकरे यांच्या या गौप्यस्फोटामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. युती न होण्यामागे संजय राऊतच कारणीभूत आहे का, अशी चर्चा होऊ लागली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.