
Union Ministry of Health देशभरात खोकल्याच्या सिरपसह सर्व प्रकारच्या लिक्विड औषधांच्या विक्रीबाबत केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता कोणतेही सिरप खरेदी करण्यासाठी ग्राहकांना डॉक्टरांची चिठ्ठी दाखवणे बंधनकारक असणार आहे. डॉक्टरांच्या मंजुरीशिवाय आता औषध दुकानांमधून थेट सिरप खरेदी करता येणार नाही. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.
सरकारने ड्रग्ज रुल्स, १९४५ मध्ये सुधारणा करून हा नियम लागू केला आहे. यामुळे सिरपची विनाप्रिस्क्रिप्शन म्हणजेच ओव्हर द काउंटर (OTC) होणारी खुली विक्री आता पूर्णपणे बंद होणार आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठी असेल तरच तुम्ही कफ सिरप खरेदी करू शकता.
हेही वाचा – Dombivli : स्वरांनी फुलला सामाजिक यज्ञ; आरोहीच्या मैफिलीत आशा भोसलेंच्या २८ गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध
काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निकृष्ट दर्जाचे कफ सिरप प्यायल्यामुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या होत्या. या घटनांमुळे सर्रास वापरल्या जाणाऱ्या लिक्विड औषधांच्या सुरक्षिततेवर आणि त्यांच्या नियमनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा घटना सातत्याने घडू नये यासाठी सिरपच्या निर्मितीवर आणि विक्रीवर कडक देखरेख ठेवण्याची मागणी सातत्याने केली जात होती. याची गांभीर्याने दखल घेत सरकारने हे कडक पाऊल उचलले आहे.
१. केंद्र सरकारने ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट, १९४०च्या कलम १२ आणि १३ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा बदल केला आहे.
२. ९ जून २०२६ रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या नियमाचा मसुदा (Draft Praposal) तयार करून त्यावर जनतेची मते मागवण्यात आली होती.
३. या नवीन सुधारणेला ‘ड्रग्ज नियम, २०२६’ असे नाव देण्यात आले आहे.
४. नवीन नियमांनुसार, ड्रग्ज रूल्स, १९४५’च्या शेड्युल Kमधील औषधांच्या श्रेणीमधून सिरप हा शब्द अधिकृतपणे वगळण्यात आला आहे.
५. सरकारी अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे, हे नवीन नियम अधिकृतपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून देशभरात तातडीने लागू केले जातील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
