पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ३ हेक्टर जागा; मंत्री Chandrashekhar Bawankule यांचा निर्णय

100
आदिवासींना मिळणार जमिनीचा कायदेशीर हक्क; महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांची माहिती
  • प्रतिनिधी

Chandrashekhar Bawankule             पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी तसेच गोमाता संवर्धनासाठी राज्य सरकारने यमाई तलावालगतची गट नं. १६१ मधील ३ हेक्टर १२ गुंठे इतकी शासकीय जमीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. (Chandrashekhar Bawankule)

(हेही वाचा – मुसलमानांनी ज्ञानवापी आणि कृष्णजन्मभूमी स्वेच्छेने हिंदूंच्या स्वाधीन करावी; माजी एएसआय संचालक K K Muhammed यांचे आवाहन)

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली. मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी या जागेची मागणी केली होती. भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि ‘गोमाता पालन-संवर्धन केंद्र’ याठिकाणी उभारण्यात येणार आहे. (Chandrashekhar Bawankule)

(हेही वाचा – Love Jihad : अल्पवयीन हिंदू मुलीवर अत्याचार, २ वेळा बळजबरी गर्भपात; निकाहानंतरही सुरु राहिला अमानुष छळाचा थरार…)

तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी (गोमाता संवर्धन आणि भाविकांची सुविधा) या जागेचा वापर सुरू करणे बंधनकारक राहील. ज्या कामासाठी जमीन दिली आहे, केवळ त्याच कामासाठी तिचा वापर करता येईल. इतर कोणत्याही तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी वापरासाठी सरकारची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता पुढील कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली जाणार असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. (Chandrashekhar Bawankule)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.