IIT Mumbai Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पांचा पर्यावरणीय अभ्यास करणार आयआयटी मुंबई

मुंबईला होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये प्रत्यक्षातील मागणी आणि प्रत्यक्षातील पुरवठा यांच्यामध्ये ६७० दशलक्ष लिटर अर्थात ६७ कोटी लिटर एवढी तुट आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मागणीतील तुट भरुन काढण्यासाठी गारगाई आणि पिंजाळ प्रकल्प हाती घेतल्यानंतरही समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर या प्रकल्पांना बाजुला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

654
IIT Mumbai Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पांचा पर्यावरणीय अभ्यास करणार आयआयटी मुंबई
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबईला होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये प्रत्यक्षातील मागणी आणि प्रत्यक्षातील पुरवठा यांच्यामध्ये ६७० दशलक्ष लिटर अर्थात ६७ कोटी लिटर एवढी तुट आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मागणीतील तुट भरुन काढण्यासाठी गारगाई आणि पिंजाळ प्रकल्प हाती घेतल्यानंतरही समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर या प्रकल्पांना बाजुला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आता पुन्हा एकदा गारगाई प्रकल्पांचा विचार केला जात आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या झाडांबाबत पर्यावरणीय अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची निवड करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेने आयआयटी मुंबई यांची निवड केली असून त्यांना पर्यावरणाच्या संर्वधनासाठी उपाययोजना सुचवण्यात येणार आहे. (IIT Mumbai Gargai Water Project)

पाण्याची मागणी व पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी नवी स्त्रोत

मुंबईत सध्या ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात असून सध्याची मागणी प्रतिदिन ४५०० दशलक्ष लिटर एवढी आहे. त्यामुळे पाण्याची मागणी व पुरवठा यांतील तफावत कमी करण्यासाठी नवी स्त्रोत विकसित करण्याची आवश्यकता लक्षात घेता विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. यासाठी २४ जानेवारी २०२३ रोजी अतिरिक्त आयुक्त प्रकल्प पी वेलरासू यांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीत पर्यावरणाच्या विविध पैलूचा विचार करून उपलब्ध स्त्रोतांचे पुन्हा मुल्यांकन करून प्राधान्य क्रम निश्चित करण्याचा निर्णय घेतला गेला. यासाठी भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई अर्थात आयआयटी मुंबई या संस्थेद्वारे अभ्यास करून घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. (IIT Mumbai Gargai Water Project)

पर्यावरण निकषाच्या आधारित प्रकल्पांचा अभ्यास

या आयआयटी मुंबई यांच्या मार्फत गारगाई, पिंजाळ व दमणगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्पांच्या स्त्रोतांचा तुलनात्मक विश्लेषण करण्याचे ठरवण्यात आले. त्यामुळे या संस्थेमार्फत उपलब्ध अहवालांची तांत्रिक व्यवहार्यता तपासून त्याचा सविस्तर अहवाल बनवने, महापालिकेला प्राप्त झालेल्या विविध उपलब्ध अहवालांचे अवलोकन करून पर्यावरणाच्या निकषाच्या आधारीत प्रकल्पांच्या एकूण पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करणे आदींचा समावेश आहे. (IIT Mumbai Gargai Water Project)

(हेही वाचा – BMC Solid Waste Management : महापालिकेचे अधिकारी करणार इंदूरच्या कचरा व्यवस्थापनाचा अभ्यास)

वृक्ष पुनर्रोपणाच्या अहवालाचे मुल्यांकन

गारगाई प्रकल्पांतर्गत परिसराच्या पर्यावरण आणि वनीकरणावर होणाऱ्या परिणामांना कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वृक्ष पुनर्रोपणाच्या अहवालाचे मुल्यांकन करणे. मुंबईकरांना अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्याने लाभांसोबतच बुडीत क्षेत्रातील छाटणी तसेच पुनर्रोपणामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा तुलनात्मक अभ्यास करून अहवाल सादर करण्याचा कामाचा समावेश आहे. (IIT Mumbai Gargai Water Project)

मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यात वाढ झाल्यास

तसेच एकंदर गारगाई प्रकल्प राबवण्यामुळे बाधित हेणाऱ्या वृक्षांच्या व त्या वृक्षांचे पुनर्रोपण केल्यानंतरही होणाऱ्या पर्यावरणीय परिणामांच्या तुलनेत मुंबईकरांना पाणी पुरवठ्यात वाढ झाल्याने होणाऱ्या फायद्यांचे परिक्षण करून मत नोंदवणे तसेच पर्यावरणाच्या संवर्धनार्थ आणखी उपाययोजना असल्यास त्या सुचवणे आदी प्रकारची कामे ही आयआयटी मुंबई (IIT Mumbai) यांच्याकडून करण्यात येणार आहे. यासाठी आयआयटी मुंबईला ३० लाख रुपये सल्लागार शुल्क अदा केले जाणार आहे. (IIT Mumbai Gargai Water Project)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.