Dr. Dattatraya Bendre: मराठी असूनही कन्नड साहित्यनिर्मिती करणारे ‘डॉ. दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे’

१९३२ मध्ये त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला, मात्र त्याआधीच कवी म्हणून त्यांची लोकांवर छाप पडली होती.

183
Dr. Dattatraya Bendre: मराठी असूनही कन्नड साहित्यनिर्मिती करणारे 'डॉ. दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे'
Dr. Dattatraya Bendre: मराठी असूनही कन्नड साहित्यनिर्मिती करणारे 'डॉ. दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे'

डॉ. दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे (Dr. Dattatraya Bendre) हे कन्नड भाषेतील सुप्रसिद्ध कवी होते. ते अंबिकातनयदत्त या टोपणनावाने साहित्यरचना करायचे. याचा अर्थ ‘अंबिकेचा पुत्र – दत्त’ असा होतो. कन्नड काव्यातल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना १९६८ मध्ये पद्मश्री, तर १९७६ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ते मराठी भाषिक असूनही त्यांनी कन्नडमध्ये कविता लिहिल्या. (Dr. Dattatraya Bendre)

दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांचा जन्म १३ जानेवारी १८९६ रोजी कर्नाटकातील धारवाड येथे झाला. त्यांचे बालपण तसे गरिबीत गेले. ते १२ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले, मात्र साहित्याचा वारसा त्यांना घरातून मिळाला. त्यांचे वडील आणि आजोबा संस्कृत साहित्याचे अभ्यासक होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर बेंद्रे धारवाड येथील व्हिक्टोरिया हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी १९४४ ते १९५६ या काळात सोलापूरच्या डी.ए.व्ही. कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम केले. तसेच पुढे ते धारवाडमधील ‘ऑल इंडिया रेडिओ’चे सल्लागारही होते. (Dr. Dattatraya Bendre)

‘बालकांड’ नावाच्या कवितेत त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी नोंदवल्या आहेत. १९३२ मध्ये त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला, मात्र त्याआधीच कवी म्हणून त्यांची लोकांवर छाप पडली होती. काही समीक्षकांनी बेंद्रे यांच्या कवितेला बौद्धिक कविता असे नाव दिले आहे कारण त्यांनी चिंतन आणि भावनाप्रधानता तसेच वस्तुनिष्ठता आणि आत्मनिष्ठता दोन्ही विषयांना त्यांनी अलगदपणे हात घातला आहे. (Dr. Dattatraya Bendre)

पुण्यामध्ये असताना त्यांनी १९१५ मध्ये रविकिरण मंडळ आणि शारदा मंडळाची स्थापना केली. तसेच त्यांनी १९५९ मध्ये म्हैसूर विद्यापीठात मराठी साहित्यावर व्याख्याने दिली आहेत. त्यांनी मराठी साहित्यकृतींचे कन्नड भाषेत अनुवादही केले होते. पद्मश्री, ज्ञानपीठ अशा पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. २१ ऑक्टोबर १९८१ मध्ये मुंबईत त्यांचे निधन झाले. (Dr. Dattatraya Bendre)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.