BMC Solid Waste Management : महापालिकेचे अधिकारी करणार इंदूरच्या कचरा व्यवस्थापनाचा अभ्यास

कचरा व्यवस्थापनातील भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूरला शहराची निवड झाली असून या शहरातील कचरा व्यवस्थापनाची पाहणी करण्यासाठी आशिया खंडातील सर्वांत मोठी महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेचे कर्मचारी जाणार आहेत.

1721
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त

कचरा व्यवस्थापनातील भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूरला शहराची निवड झाली असून या शहरातील कचरा व्यवस्थापनाची पाहणी करण्यासाठी आशिया खंडातील सर्वांत मोठी महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेचे कर्मचारी जाणार आहेत. येत्या फेब्रुवारी तथा मार्च २०२४ मध्ये दोन दिवसीय अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन  विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक आणि अभियंते हे अभ्‍यास भेटीत सहभागी होणार आहेत. इंदूर अभ्‍यास भेटीमध्ये दैनंदिन कचरा संकलन, कचरा हाताळणी, विलगीकरणाची आव्हाने, कचरा प्रक्रिया प्रकल्प, कचरा समस्यासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजना, सफाई कामगारांची भूमिका, कचरा हाताळताना सुरक्षितता, सामुदायिक सहभाग आणि इंदूरच्या यशस्वी कचरा व्यवस्थापन प्रणालीतून मिळालेल्या इतर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. (BMC Solid Waste Management)

दरदिवशी ६,३०० मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्‍त (घनकचरा व्‍यवस्‍थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे यांच्‍या नियंत्रणाखाली घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाचे कामकाज अविरतपणे सुरू आहे. सरासरी ६ हजार ३०० मेट्रिक टन कचऱ्याची कांजूरमार्ग व देवनार क्षेपणभूमी येथे तर सरासरी ७५० ते ८०० मेट्रिक टन राडारोड्याची देवनार क्षेपणभूमी येथे विल्‍हेवाट लावण्‍यात येते. ९४९ सामुदायिक कचरा संकलन केंद्र आणि ४७ सुका कचऱ्याचे वर्गीकरण केंद्र येथे कचऱ्याचे संकलन आणि वर्गीकरण केले जाते. (BMC Solid Waste Management)

स्वच्छता मोहीमेसाठी ६१ मुद्यांचा समावेश

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या निर्देशानुसार, महानगरपालिकेच्‍या प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड)  दर आठवड्यात एक दिवस संपूर्ण स्वच्छ‍ता मोहीम (Deep Clean Drive) राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवित आहेत. महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीमेसाठी ६१ मुद्यांचा समावेश असलेली प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित केली आहे. (BMC Solid Waste Management)

देशात पहिल्या दहामध्ये येण्‍यासाठी

महानगरपालिका देशातील अग्रगण्य व महत्त्वाची महानगरपालिका असून स्वच्छ, सुंदर, हरित शहर म्हणून महानगरपालिकेची ओळख आहे. सार्वजनिक स्वच्छतेतही महानगरपालिका अग्रेसर आहे. स्वच्छता अभियानात देशात ‘टॉप टेन’ मध्ये येण्याची महानगरपालिकेची क्षमता आहे. त्‍यामुळे स्वच्छता अभियानात देशात पहिल्या दहामध्ये अर्थात ‘टॉप टेन’ मध्ये येण्‍यासाठी नियोजन करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. (BMC Solid Waste Management)

(हेही वाचा – Ashok Saraf : अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर)

दोन दिवसीय अभ्यास भेटीचे आयोजन

या अंतर्गत घनकचरा व्यवस्‍थापन खात्यातील कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने क्षमता बांधणी उपक्रम आयोजित केला आहे. कचरा व्यवस्थापनातील भारतातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूरला फेब्रुवारी तथा मार्च २०२४ मध्ये दोन दिवसीय अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन  विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक आणि अभियंते हे अभ्‍यास भेटीत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र सरकारची शैक्षणिक संस्था म्हणून मान्यताप्राप्त असलेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांची अभ्‍यास भेटीचे आयोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. (BMC Solid Waste Management)

कनिष्ठ पर्यवेक्षकाचे योगदान महत्त्वपूर्ण

महानगरपालिका स्वच्छ भारत मिशन २.० च्या मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत क्षमता बांधणी उपक्रम राबवून स्वच्छ, हरित आणि अधिक शाश्वत मुंबईचा दृष्टीकोन साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे. प्राथमिक स्तरावर काम करणारे सफाई कामगार व कनिष्ठ आवेक्षक हे कचरा संकलन यंत्रणेचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. त्यांचे योगदान आणि कौशल्याचा थेट परिणाम कचरा संकलनाच्या कार्यक्षमतेवर आणि शहर स्वच्छतेवर होतो. कचरा संकलन यंत्रणेचे सुरळीत कार्य सुनिश्चित करण्यात, शहराची स्वच्छता तसेच शहर सौंदर्य राखण्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे, विशेषतः कनिष्ठ पर्यवेक्षकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. (BMC Solid Waste Management)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.