Ashok Saraf : अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

Ashok Saraf : अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

218
Ashok Saraf : अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर
Ashok Saraf : अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर

मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ (Maharashtra Bhushan Puraskar) देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवार, ३० जानेवारी रोजी येथे केली.

(हेही वाचा – Deep Cleaning Drive : वडाळा भागातील मैदानात अनधिकृत भराव; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल)

मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

इंडस्ट्रीतील पन्नास वर्षे सत्कारणी लागली – अशोक सराफ

‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा पुरस्कार आहे. तो मला जाहीर झाला, याचा मला अतिशय आनंद आहे. मला एका मोठ्या स्थानावर नेऊन बसवल्याचा आनंद आहे. वयाची पन्नास वर्षे माझी इंडस्ट्रीत (marathi film industry) सत्कारणी लागली असल्याचा आनंद झाला. आपली कामगिरी कुठे तरी रुजू होतेय, याचा देखील आनंद झाला. आतापर्यंत अनेक दिग्ग्जांना हा पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्यासोबत मला पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहे, असे मनोगत अशोक सराफ यांनी व्यक्त केले आहे.

अनेक पुरस्कारांनीही सन्मानित

अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, तसेच थिएटरमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आल आहे. मराठीसोबतच हिंदी मालिकांमधूनही अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

अभिनेता अशोक सराफ यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. सोबतच थिएटरमधील कामही सुरु ठेवलं. गेली पन्नासहून अधिक वर्षे ते या अभिनय क्षेत्राशी जोडले गेलेले आहेत. (Ashok Saraf)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.