Deep Cleaning Drive : वडाळा भागातील मैदानात अनधिकृत भराव; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महानगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम राबविण्यासोबतच रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करत प्रदूषणास कारणीभूत ठरणारी व्यक्ती, बांधकाम व्यावसायिक तसेच अन्य संबंधितांविरोधात दंडात्मक तसेच अन्य कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

987
Deep Cleaning Drive : वडाळा भागातील मैदानात अनधिकृत भराव; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार वडाळा येथील मोकळ्या मैदानामध्ये अनधिकृतपणे राडारोडा (Debris) टाकणाऱ्या पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद करत यासाठी वापरण्यात आलेले आठ डंपर आणि एक पोकलेन मशीन ताब्यात घेतले आहेत. या ताब्यात घेतलेल्या संबंधित वाहनाची नोंदणी त्वरित रद्द करण्याबाबत परिवहन आयुक्तांना लेखी कळविण्याचे निर्देशही महापालिका प्रशासनाने दिले आहेत. (Deep Cleaning Drive)

New Project 2024 01 30T180939.067

स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निर्देशानुसार, महानगरपालिकेकडून व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता मोहीम (Deep Cleaning Drive) राबविण्यात येत आहे. यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र स्वच्छता अभियान सुरू आहे. त्यामध्ये मुंबईतील कानाकोपऱ्यातील रस्ते तसेच अन्य ठिकाणांची स्वच्छता राखण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम राबविण्यासोबतच रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करत प्रदूषणास कारणीभूत ठरणारी व्यक्ती, बांधकाम व्यावसायिक तसेच अन्य संबंधितांविरोधात दंडात्मक तसेच अन्य कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. विविध भागांतील स्वच्छताविषयक कामकाजासाठी प्रमाणित कार्यपद्धती (SOP) जारी करण्यात आली असून पथकांची नेमणूक करत नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. (Deep Cleaning Drive)

New Project 2024 01 30T181205.643

(हेही वाचा – Prakash Ambedkar : …तर मुसलमानांच्या हाती राजकीय खेळी; वंचितचा मुसलमान वोट बॅंकेला हात)

या वाहनचालकांविरोधात गुन्हा नोंदविला

मुंबईत राडारोडा (Debris) टाकण्यासाठी नियमानुसार परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु, वडाळा येथील भक्ती पार्क मोनोरेल स्थानकाच्या बाजूला एमएमआरडीएच्या (MMRDA) मोकळ्या मैदानामध्ये डंपरच्या साहाय्याने काही व्यक्ती अनधिकृतपणे राडारोडा टाकत होते. उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त (एफ उत्तर विभाग) चक्रपाणी अल्ले यांच्या देखरेखीखाली पर्यवेक्षक (घनकचरा व्यवस्थापन) शरद जुवाटकर, सहायक अभियंता कैलास वाटेकर, भारत पाटील, पुंडलिक सोहनी आणि बाबा गायकवाड यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन कार्यवाही केली. या वेळी त्यांना तिथे राडारोडाने भरलेले चार डंपर, चार रिकामे डंपर आणि एक पोकलँड संयंत्र आढळून आले. त्यानंतर लगेचच त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मेहबुब पटेल (बोनसरी गाव), राजू केसबन नायडू (विजय नगर), रामदास मोनू प्रसाद (कुर्ला), मोहम्मद सलीम इबारत अली (भांडूप), उजैर अहमद मोहम्मद इसहार खान (वडाळा) या वाहनचालकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, अशाप्रकारे अनधिकृतपणे सार्वजनिक ठिकाणी राडारोडा (Debris) टाकणाऱ्यांविरोधात कठोर कार्यवाही करण्यासाठी सुयोग्य प्रणाली विकसित करण्याचे निर्देश प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Deep Cleaning Drive)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.