Prakash Ambedkar : …तर मुसलमानांच्या हाती राजकीय खेळी; वंचितचा मुसलमान वोट बॅंकेला हात

Prakash Ambedkar : मुसलमानांनी मनात आणले, तर भाजपच्या 40 जागा हातातून जातील. काँग्रेसने एकट्याने लढल्यास त्यांच्या 50 टक्के उमेदवारांचे डिपॉजिट जप्त होईल, असे वक्तव्य वंचितचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

194
Prakash Ambedkar : ...तर मुसलमानांच्या हाती राजकीय खेळी; वंचितचा मुसलमान वोट बॅंकेला हात
Prakash Ambedkar : ...तर मुसलमानांच्या हाती राजकीय खेळी; वंचितचा मुसलमान वोट बॅंकेला हात

भाजपने (BJP) मुस्लिमांना ब्लॅक आऊट केले आहे. त्यामुळे भाजप त्यांच्याकडे लक्ष देत नाही. याच कारणामुळे मुस्लिमांना आता सेक्युलर पक्षांकडे जाण्याची संधी आहे. असे असतांना जर शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस आणि वंचित जर वेगवेगळे लढले, तर तर धर्माचे राजकारण संपूण जाईल. त्या वेळी सर्वच उमेदवार हे हिंदू असतील. त्यानंतर समाजाचे राजकारण सुरु होईल. जो आपल्या समाजाचे मत घेऊन क्रॉस व्होटिंगसाठी प्रयत्न करेल, जो मोठ्या समाजाचा असेल, त्याला मुसलमानांनी मतदान करावे. तो उमेदवार हा भाजपला चांगली लढत देऊ शकेल, असे धर्मावर आधारित विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे.

(हेही वाचा – Elon Musk Neuralink Implant : ‘पहिली न्युरालिंक’ एका रुग्णाच्या मेंदूत बसवली)

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) काँग्रेस (Congress) एकट्याने लढली, तर अर्ध्याहून अधिक जागांवर डिपॉझिट जप्त होईल. मुसलमानांनी मनात आणले, तर भाजपच्या 48 पैकी 40 जागांचे मोठे नुकसान होऊ शकेल.

मुसलमानांनी (muslim vote bank) योग्य उमेदवाराला मतदान केले, तर भाजपच्या 40 टक्के उमेदवारांचा आणि काँग्रेसच्या अर्ध्या उमेदवारांचं डिपॉजिट जप्त होईल. काँग्रेस जर एकट्याने लढली, तरी त्यांच्या अर्ध्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त होणार आहे. इंडि आघाडीचे जे झाले, ते महाविकास आघाडीचे झाले, तरीही मुस्लिमांच्या हाती राजकीय खेळी राहू शकते, असे विधान करून वंचितने मुस्लिम वोट बॅंकेला हात घातला आहे.

(हेही वाचा – Sarfaraz Khan in Indian Team : अखेर मुंबईकर सर्फराजची भारतीय संघात वर्णी)

काँग्रेसने इतर पक्षांना आदर द्यायला पाहिजे

या आधीही सोलापूरमध्ये बोलतांना प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर (Congress) टीका केली होती. ते म्हणाले होते की, काँग्रेस जर एकटी मोदींना हाताळू शकली असती, तर त्यांनी इतरांना बरोबर घेतले नसते. जर तुम्ही ताकतवान नाही आणि इतरांना बरोबर घेता, त्या वेळी तुम्ही त्यांचा आदर करायला शिकले पाहिजे. इतरांना शेअर करायलाही शिकले पाहिजे.

तुम्ही जागांची बाहेर कितीही अवास्तव मागण्या केल्या, तरी बैठकीत बसल्यावर वास्तवाचं भान ठेवले पाहिजे असा सल्ला दिला. (Prakash Ambedkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.