Sarfaraz Khan in Indian Team : अखेर मुंबईकर सर्फराजची भारतीय संघात वर्णी

अलीकडेच भारतीय ए संघाकडून खेळताना सर्फराजने शतक केलं होतं. 

177
Sarfaraz Khan in Indian Team : अखेर मुंबईकर सर्फराजची भारतीय संघात वर्णी
  • ऋजुता लुकतुके

देशांतर्गत क्रिकेट आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा ओढणाऱ्या सर्फराज खानचा अखेर भारतीय संघात पराभव झाला आहे. रवींद्र जाडेजा आणि के एल राहुलच्या दुखापतीमुळे सर्फराज, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. वॉशिंग्टन सुंदरही गेली काही वर्ष भारतीय संघाच्या वेशीवर होता. तर सर्फराजच्या कामगिरीचीही अखेर २६ व्या वर्षी निवड समितीचे दखल घेतली आहे. (Sarfaraz Khan in Indian Team)

(हेही वाचा – Kalwa Hospital : कळवा हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा निष्काळजीपणा; मुलाने गमावला हात)

सर्फराज खानने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ४५ कसोटींत ६९ धावांच्या सरासरीने ३,९१२ धावा केल्या आहेत. ३०१ नाबाद ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. अलीकडेच इंग्लंड लायन्स संघाविरुद्धही त्याने २४ जानेवारीला १६१ धावा केल्या होत्या. सर्फराज खानच्या संघातील समावेशामुळे मुंबई संघातील त्याचा सहकारी सूर्यकुमार यादवनेही आनंद व्यक्त केला आहे. सूर्यकुमारने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत ‘उत्सव साजरा करण्याची तयारी करा,’ असा संदेश लिहिला आहे. (Sarfaraz Khan in Indian Team)

New Project 2024 01 30T154726.621

भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणतो, ‘प्रचंड आनंद झालाय. या मुलाची भारतीय संघात निवड झाली आहे. भाई! चला. उत्सवाची तयारी करा.’ काही तासांनी सर्फराज खाननेही सूर्यकुमारची ही स्टोरी शेअर केली आहे. सर्फराज खान हा नौशाद खान या मुंबईतील यशस्वी क्रिकेट प्रशिक्षकाचा मुलगा आहे. १६ व्या वर्षीच मुंबईच्या रणजी संघात त्याची निवड झाली होती. त्यानंतर संघासाठी त्याने सातत्यपूर्ण धावा केल्या आहेत. अलीकडेच १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक ठोकणारा मुनीर खान हा सर्फराजचा भाऊ आहे. (Sarfaraz Khan in Indian Team)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.