Elon Musk Neuralink Implant : ‘पहिली न्युरालिंक’ एका रुग्णाच्या मेंदूत बसवली

सर्जिकल रोबो अशी ओळख असलेल्या या चिपसाठी एलॉन मस्क यांनी खूप मोठा निधी पुरवला आहे. 

195
Elon Musk Neuralink Implant : 'पहिली न्युरालिंक' एका रुग्णाच्या मेंदूत बसवली
  • ऋजुता लुकतुके

न्युरालिंकची पहिली चिप अमेरिकेत एका रुग्णाच्या मेंदूत इम्पान्ट करण्यात आलीय. अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या नवीन स्टार्टअपने हे उत्पादन बनवलं आहे. आणि मस्क यांचं हे नवीन महत्त्वाकांक्षी उत्पादन मानलं जातं. तंत्रज्ञानावर आधारित नवनवीन कल्पना राबवण्यासाठी मस्क ओळखले जातात. आताची ही ब्रेन चिप पॅरालिसिस आणि इतर काही मेंदू तसंच मज्जासंस्थेशी संबंधित रोगांवर उपचार करणार आहे. चाचण्या यशस्वी झाल्या तर वैद्यकीय क्षेत्रात हा प्रयोग क्रांतीकारक ठरू शकेल. (Elon Musk Neuralink Implant)

अमेरिकेच्या अन्न व औषध नियामक मंडळाने अलीकडेच या चिपच्या प्रत्यारोपणाला आणि पुढील चाचण्यांना परवानगी दिली होती. एलॉन मस्क यांनीच एका ट्विटमधून या चाचणीची माहिती दिली. (Elon Musk Neuralink Implant)

(हेही वाचा – Andhra University Distance Education : आंध्र विद्यापीठाच्या डिस्टन्स शिक्षण पद्धतीचे ‘हे’ आहेत ५ फायदे)

न्युरालिंक असे करेल काम

न्युरालिंकच्या पहिल्या उत्पादनाचं नाव टेलिपथी असं असेल. मस्क यांनी या चिपला सर्जिकल रोबो म्हटलं आहे. ती अर्थातच संगणकाला जोडलेली असेल. आणि रुग्णाच्या मेंदू तसंच मज्जासंस्थेत चाललेल्या हालचाली ती अचूकपणे संगणकाला कळवेल. आणि पुढे जाऊन संगणकाने उपचारासंबंधी दिलेले आदेश ही चिप काही प्रमाणात सध्या पाळू शकेल. (Elon Musk Neuralink Implant)

आता या उपकरणाची चाचणी सुरू आहे. आणि रुग्ण या चिपला कसा प्रतिसाद देतो यावरून वैद्यकीय क्षेत्रातील हे नवीन उत्पादन क्रांती घडवून आणू शकेल का हे कळेल. या उपकरणाच्या सुरक्षिततेवरून अमेरिकेत आधीच चर्चा सुरू झाली आहे. हे उत्पादन बनवताना मस्क यांच्या कंपनीने सुरक्षिततेचे निकष पाळले नसल्याची टीकाही कंपनीवर झाली होती. त्यामुळे गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील अन्न व औषध नियामक मंडळाने चौकशीचे आदेशही दिले होते. पण, आता सगळ्या परवानग्या मिळून या उत्पादनाची चाचणी सुरू झाली आहे. (Elon Musk Neuralink Implant)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.