Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये हालचाली चालू; मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत बैठकीला जाणार

132
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये हालचाली चालू; मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत बैठकीला जाणार
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये हालचाली चालू; मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत बैठकीला जाणार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणाने वेग घेतला आहे. (Lok Sabha Elections 2024) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) येत्या आठवड्यात दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत अतिशय महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे, अशी माहिती दिली जात आहे. लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने रणनिती ठरवण्यासाठी दिल्लीत भाजपप्रणित एनडीएची दिल्लीत अतिशय महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Sarfaraz Khan in Indian Team : अखेर मुंबईकर सर्फराजची भारतीय संघात वर्णी)

एनडीएच्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती दिली जात आहे. भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत ही बैठक पार पडणार आहे. विशेष म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह एनडीएमधील घटक पक्षांचे प्रमुख नेतेदेखील या बैठकीत सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्रात महायुतीचे जागावाटप कसे?

महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील गट आणि काँग्रेस हे पक्ष इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि इतर लहान पक्षांसोबतही विरोधी पक्षांच्या चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. (Lok Sabha Elections 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.