LIC Stake in HDFC : एलआयसीची वाढीव गुंतवणूक एचडीएफसी बँकेसाठी किती लाभदायक?

एचडीएफसी बँकेनं अलीकडेच आपल्या कर्ज वितरण आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांचं विलिनीकरण केलं आहे. 

173
LIC Stake in HDFC : एलआयसीची वाढीव गुंतवणूक एचडीएफसी बँकेसाठी किती लाभदायक?
  • ऋजुता लुकतुके

गेल्या आठवड्यात देशातील सगळ्यात मोठी शेअर बाजार गुंतवणूक करणारी कंपनी एलआयसीला (LIC) एचडीएफसी बँकेतील आपली गुंतवणूक वाढवण्याची परावानगी मिळाल्यानंतर एचडीएफसी बँक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आधीच विलिनीकरणानंतर एचडीएफसी (HDFC) ही देशातील सगळ्यात मोठी खाजगी बँक बनली आहे. त्यातच आता एलआयसीच्या गुंतवणुकीमुळे विलिनीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्याही कमी होतील, असा जाणकारांचा होरा आहे. (LIC Stake in HDFC)

एलआयसीची एचडीएफसी बँकेतील सध्याची हिस्सेदारी ५.२ टक्के इतकी आहे. आणि ती ९.९ टक्क्यांपर्यंत न्यायला रिझर्व्ह बँकेनं परवानगी दिली आहे. आणि एचडीएफसी बँकेसाठी ही नक्कीच चांगली बातमी आहे. गेल्यावर्षी एचडीएफसीच्या विलिनीकरणानंतर कंपनीची तिमाही आकडेवारी बिघडली होती. एचडीएफसी (HDFC) बँकेची कामगिरी या तिमाहीत नरम गरम होती. मुदतठेवी म्हणाव्या तशा वाढल्या नाहीत. आणि अर्निंग पर शेअरवरही परिणाम झाला होता. त्यामुळे तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर एचडीएफशीच्या शेअरमध्ये १४ टक्क्यांची घसरण झाली होती. (LIC Stake in HDFC)

(हेही वाचा – Sarfaraz Khan in Indian Team : अखेर मुंबईकर सर्फराजची भारतीय संघात वर्णी)

इतकी आहे LIC ची HDFC मधील आताची हिस्सेदारी

पण, एलआयसीचा (LIC) सहारा मिळाल्यावर गुंतवणूकदारांचाही विश्वास या शेअरमध्ये वाढेल अशी चिन्हं आहेत. शिवाय कंपनीलाही मिळणारा अतिरिक्त निधी कामकाज सुरळीत करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे इक्विनॉमिक्स रिसर्च कंपनीचे संस्थापक चोकालिंगम जी यांनी एचडीएफसी शेअरला आलेली मरगळ नवीन वर्षी नाहीशी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. (LIC Stake in HDFC)

‘एचडीएफसी बँक आता छोटी शहरं आणि ग्रामीण भागात सेवेचा विस्तार करू शकेल. आणि ती कंपनीची पुढील गरज आहे. ते शक्य झालं की, येत्या वर्षात कंपनीच्या शेअरमध्येही १५ टक्के वाढ होण्याची आम्हाला आशा आहे,’ असं चोकालिंगम यांनी म्हटलं आहे. एलआयसीची (LIC) एचडीएफसीमधील आताची हिस्सेदारी जवळ जवळ ५०,००० कोटी रुपये इतकी आहे. आणि आता आणखी जवळ जवळ इतकेच पैसे एलआयसी (LIC) बँकेत ओतणार आहे. अर्थात हे पैसे टप्प्या टप्प्याने गुंतवले जाणार आहेत. आणि रिझर्व्ह बँकेनंही त्यासाठी एक वर्षांची मर्यादा सुचवली आहे. (LIC Stake in HDFC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.