AWES : आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीचे उद्दिष्ट आणि दूरदॄष्टी

देशभरातील अनेक शहरांमध्ये आर्मी पब्लिक स्कूल्स व अनेक महाविद्यालये आणि शाळा बांधल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंत संबंधित, व्यवस्थापन, कायदा इत्यादींशी संबंधित अनेक महाविद्यालयांचा समावेश आहे.

135
AWES : आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीचे उद्दिष्ट आणि दूरदॄष्टी

आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (AWES) स्थानिक लष्करी प्राधिकरणांमार्फत भारतीय लष्करातील जवानांच्या मुलांना योग्य शैक्षणिक सुविधा प्रदान करते. या संस्थेची स्थापना १९८३ मध्ये झाली. सोसायटीचे कार्यालय शंकर विहार, दिल्ली येथे आहे. या ४० वर्षांत संस्थेने डोंगराएवढे कार्य करुन ठेवले आहे. (AWES)

या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे काही वर्षांत संपूर्ण भारतात १३७ हून अधिक आर्मी पब्लिक स्कूल आणि २४९ आर्मी प्री प्रायमरी स्कूल या संस्थेने उघडल्या आहेत. त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी १२ व्यावसायिक संस्था आहेत. देशभरातील अनेक शहरांमध्ये आर्मी पब्लिक स्कूल्स व अनेक महाविद्यालये आणि शाळा बांधल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंत संबंधित, व्यवस्थापन, कायदा इत्यादींशी संबंधित अनेक महाविद्यालयांचा समावेश आहे. (AWES)

सुरुवातीला ज्यावेळी या संस्थेची स्थापना झाली तेव्हा अनेक लोक या छावणीत येऊ लागले. त्यावेळेस अशी परिस्थिती होती की खाजगी शाळा सैनिकांच्या मुलांना शिक्षण देण्याच्या बाबतीत खूप महागड्या होत्या. केंद्रिय विद्यालयाद्वारे देखील त्यांना आशेचा किरण मिळाला नाही. १९६२-१९७३ मध्ये भारतीय सैन्याचा विस्तार झाला, त्यामुळे ही समस्या अधिक तीव्र झाली. सर्व स्तरातील लोकांची इच्छेची पूर्तता करण्यासाठी काही रेजिमेंटल शाळा भारतभर पसरल्या. मात्र या शाळांना आमच्या अधिकारी, जेसीओ आणि इतर पदांना अपेक्षित असलेली गुणवत्ता देता आली नाही. म्हणून संस्थेने पुढाकार घेतला. (AWES)

एफडीआरसी

एफडीआरसी द्वारे महत्वाचा उपक्रम राबवण्यात आला. शाळांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करण्यासाठी, शिक्षकांच्या सक्षमीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षण हे अतिशय महत्वाचे क्षेत्र असल्याने, शिक्षकांना साधने, तंत्रे आणि आधुनिक पद्धतींनी सुसज्ज करणे आवश्यक आहे. जेणेकरून ते मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवू शकतील. ही गरज पूर्ण करण्यासाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर (FDRC) ची स्थापना मार्च २००९ मध्ये करण्यात आली होती. (FDRC) आता केवळ एपीएस आणि आर्मी प्री प्रायमरी स्कूलच्या शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करत नाही तर आसाम रायफल्स स्कूल, एनएसजी, नौदल आणि हवाई दलाद्वारे चालवण्यात येणार्‍या सैनिक शाळा, राष्ट्रीय सैनिकी शाळा आणि इतर शाळांच्या शिक्षकांसाठीदेखील कार्यशाळा आयोजित करते. एफडीआरसी (FDRC) हे ’सेंटर ऑफ एक्सलेन्स’ म्हणून उदयास येत आहे. (AWES)

(हेही वाचा – Deep Cleaning Drive : वडाळा भागातील मैदानात अनधिकृत भराव; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल)

आर्मी प्री प्रायमरी स्कूल

२००५ मध्ये एपीईसी च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत अर्ली चाइल्ड केअर ऍंड एज्युकेशन प्रोग्राम निर्माण करण्याच्या उद्देशाने आर्मी व्हाइफ वेलफेअर असोसिएशन अंतर्गत आर्मी प्री स्कूल इज्युकेशन काउंसिलची स्थापना करण्यात आली. स्थानिक संरचनेद्वारे नियंत्रित असलेल्या या शाळांना एडब्ल्यूईएस (AWES) द्वारे अभ्यासक्रमात सहकार्य, शैक्षणिक प्रशिक्षण आणि पुस्तके प्रदान केली जातात. आता आर्मी पब्लिक स्कूल म्हणून नियुक्त केलेल्या शाळा भारत सरकारद्वारे ऍन्युअल मेजर वर्क्स प्रोग्राम अंतर्गत बांधल्या जातात. महाविद्यालये मात्र ऍडज्युटेंट जनरल्स वेलफेअर फंडच्या निधीतून निर्माण केले जातात. आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीचे मुख्य ध्येय सैनिकांच्या मुलांना चांगले प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं करण आणि त्यांच्या कुटुंबियांना सहकार्य करणे असे आहे. (AWES)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.