30 November Deadline : ज्येष्ठ नागरिकांनी ३० नोव्हेंबरपूर्वी ‘हे’ काम कराच

ज्येष्ठ नागरिकांनी ३० नोव्हेंबरपूर्वी आपला हयातीचा दाखला सादर केला नाही तर त्यांचं निवृत्तीवेतन बंद होऊ शकतं.

244
30 November Deadline : ज्येष्ठ नागरिकांनी ३० नोव्हेंबरपूर्वी 'हे' काम कराच
30 November Deadline : ज्येष्ठ नागरिकांनी ३० नोव्हेंबरपूर्वी 'हे' काम कराच
  • ऋजुता लुकतुके

ज्येष्ठ नागरिकांनी ३० नोव्हेंबरपूर्वी आपला हयातीचा दाखला सादर केला नाही तर त्यांचं निवृत्तीवेतन बंद होऊ शकतं.

केंद्र सरकार (Central Govt.) तसंच राज्यसरकारच्या (State Govt) निवृत्तीवेतनधारक ज्येष्ठ नागरिकांनी आपला हयातीचा दाखला सरकारला सादर करण्याची मुदत ३० नोव्हेंबरला संपत आहे. जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांचं निवृत्तीवेतन किंवा पेन्शन बंद होऊ शकतं. जवळची बँकेची शाखा, ऑनलाईन किंवा बँक कर्मचाऱ्याला घरी बोलावून आपलं जीवन प्रमाणपत्र दाखल केलं जाऊ शकतं. एकदा सादर केलेलं जीवन प्रमाणपत्र हे १२ महिन्यांसाठी वैध असतं. त्यामुळे दरवर्षी ३० नोव्हेंबरच्या आत ही प्रक्रिया माजी सरकारी कर्मचाऱ्यांना करावी लागते. (30 November Deadline)

जीवन प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी लागणारी इतर कागदपत्रं
  • पीपीओ क्रमांक
  • आधार क्रमांक
  • बँक खात्याची माहिती
  • आधारला जोडलेला मोबाईल क्रमांक

काही कारणांनी ३० नोव्हेंबरची मुदत संपली तर जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे काही उपाय आहेत का?

३० नोव्हेंबरची मुदत संपली तर काय करायचं?

३० नोव्हेंबरपर्यंतच्या मुदतीत जीवन प्रमाणपत्र सादर केलं नाही तर तुमचं निवृत्तीवेतन थांबू शकतं आणि हे प्रमाणपत्र सेंट्रल पेन्शन प्रोसेसिंग सेंटरपर्यंत पोहोचल्यावरच तुमचं निवृत्तीवेतन पुन्हा सुरू होईल. (30 November Deadline)

निवृत्तीवेतनधारक किंवा ज्या कुटुंबीयांना वेतनाचा लाभ मिळतो, अशा लोकांनी खालील सात मार्गांनी आपली जीवन प्रमाणपत्र दाखल करावी,

  • जीवन प्रमाणपत्र पोर्टलवर जाऊन ऑनलाईन ही प्रक्रिया पार पाडता येते
  • उमंग मोबाईल ॲपवरही ऑनलाईन हे काम होतं
  • घरपोच बँकिंग सेवा देणाऱ्या एजंट करवी हे काम करता येतं. अशा एजंटला डोअरस्टेप बँकिंग एजंट म्हणतात
  • पोस्ट ऑफिसमध्ये असलेल्या बायोमेट्रिक साधनांद्वारे तुम्ही हे प्रमाणपत्र सादर करू शकता
  • सरकारने व्हीडिओवर आधारित कस्टमर ओळख यंत्रणाही विकसित केली आहे
  • फेस ऑथेंटिफिकेशन यंत्रणा
  • किंवा पेन्शन प्रोसेसिंग कार्यालयात जीवनपत्राची प्रमाणित प्रत देणे

(हेही वाचा – World T20 2024 : नामिबिया संघ वर्ल्ड टी-२० २०२४ साठी पात्र)

युआयडीएआय तसंच पेन्शनधारक समाजकल्याण निधी या संस्थांनी ३० नोव्हेंबरपर्यंत या महत्त्वाच्या कामासाठी एक जागृती कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत १०० शहरांमध्ये दीडशे केंद्रांवर पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी शिबीरं आयोजित करण्यात आली आहेत. ही शिबिरं ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत. तुम्हीही अशा नजीकच्या केंद्रावर जाईन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपलं जीवन प्रमाणपत्र मिळवू शकता. (30 November Deadline)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.