Cylinder Blast : चेंबूर मध्ये सिलिंडरच्या स्फोटाने घर कोसळलं; चार जण जखमी

या घटनेमध्ये ११ जणांची पहिल्या मजल्यावरून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

80
Cylinder Blast : चेंबूर मध्ये सिलिंडरच्या स्फोटाने घर कोसळलं; चार जण जखमी
Cylinder Blast : चेंबूर मध्ये सिलिंडरच्या स्फोटाने घर कोसळलं; चार जण जखमी

मुंबईतील चेंबुर (Chembur) परिसरातून आगीची एक मोठी घटना समोर आली आहे. वन प्लस वन असलेल्या एका घरात गॅस सिलिंडरचा (cylinder) मोठा स्फोट झाला. त्यामुळे घर कोसळल्याची घटना घडली आहे. यात चार जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Cylinder Blast)

जुनी बॅरॅक गोल्फ क्लबजवळ असलेल्या एका वन प्लस वन घरांच्या चाळीत ही घटना घडली आहे. चाळीतील सलग चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या घरात स्फोट झाला आहे.घटना घडताच नागरिकांची आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू झाली. यामध्ये वरच्या मजल्यावरील व्यक्ती वरतीच अडकल्या होत्या.

(हेही वाचा : Increase In Vegetable Prices: भाज्यांची आवक घटली, दरही वाढले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

 घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले. वरती अडकलेल्या व्यक्तींची सुखरुप सुटका करण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करण्यात आले.या घटनेमध्ये ११ जणांची पहिल्या मजल्यावरून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर ४ जखमी व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. विकास अंभोरे (वय ५०), अशोक अंभोरे (२७ वर्षे), सविता अंभोरे (४७ वर्षे), रोहित अंभोरे (२९ वर्षे) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.