Chatgptचा वापर करताना कोणत्या ५ खबरदारी घ्याल? 

206

कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की त्याचे फायदे-तोटे याबद्दल चर्चा होते. म्हणजे अगदी लहानपणी निबंधाचा कायम एक विषय असायचा की विज्ञान शाप की वरदान? त्या निबंधात आम्ही आवर्जून लिहायचो की, विज्ञान हे एक शस्त्र आहे, ते कसे चालवायचे, वापरायचे याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय जर त्याचा उपयोग केला, तर तोटाच होणार; अन्यथा फायदा नक्की आहे. त्याचप्रमाणे चॅट जीपीटीच्या संदर्भात सुद्धा त्याची पूर्ण माहिती घेऊन सजगपणे आणि सतर्कपणे त्याचा वापर केल्यास आपले अनेक संभाव्य प्रश्न सुटू शकतात.

चॅट जीपीटीचा वापर करत असताना सावध राहणे आणि एआय मॉडेल किंवा कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी संवाद साधताना संवेदनशील किंवा वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती शेअर करणे टाळणे आवश्यक आहे. जरी संबंधित संस्था आपल्या सुरक्षिततेला आणि गोपनीयतेला प्राधान्य देत असली तरी सुद्धा, कोणतीही सिस्टम पूर्णपणे सुरक्षित नाही, याचे भान बाळगावेच लागेल. बरेचदा योग्य पडताळणी न केल्यामुळे किंवा घाईघाईने पुढे गेल्याने काही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपण दैनंदिन ऑनलाईन व्यवहार करताना जी काळजी घेतो, खबरदारी घेतो, तीच सर्व या ठिकाणी सुद्धा घेणे क्रमप्राप्त आहे.

(हेही वाचा Maharashtra Politics : विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळतील ‘इतक्या’ जागा? उदयनराजेंनी सांगितला आकडा)

‘या’ ५ सतर्कता बाळगा!

  • चॅट जीपीटीचा वापर आवश्यकतेनुसारच करावा. कारण, ही सुविधा सुरू करण्यासाठी आपली संवेदनशील माहिती उदाहरणार्थ जन्मतारीख, मोबाईल क्रमांक द्यावा लागतो. जसे ई-मेल किंवा फेसबुक इन्स्टाग्रामसारखी समाजमाध्यमे तसेच चॅट जीपीटी या ठिकाणी शक्य असल्यास आपला दुसरा मोबाईल नंबर वापरावा जो आपण आर्थिक व्यवहार करताना वापरत नाही.
  • आवश्यक माहिती योग्य शब्दांचा वापर करून मागा. कारण शेवटी ते तंत्रज्ञान आहे, जसे मागाल तसे पुरवले जाणार.
  • चॅट जीपीटीवरून मिळालेली माहिती अधिकृतरित्या वापरताना योग्य ती पडताळणी करून घ्यावी. कारण, यासंदर्भात कोणतीही हमी चॅट जीपीटीकडून दिली जात नाही. अर्धवट माहिती किंवा अज्ञान हे अनेक समस्यांचे किंवा गोंधळाचे मूळ असते.
  • चॅट जीपीटीची chat.openai.com ही अधिकृत वेबसाईट आहे. त्यामुळे अन्य कुठूनही कोणत्याही वेबसाईटवर लॉगिन करू नये.
  • नकली वेबसाईट्सद्वारे आजन्म चॅट जीपीटी मोफत सुविधा वापरा, असे आमिष आपल्याला दाखवले जाते आणि त्याद्वारे मालवेअर आपल्या उपकरणांमध्ये येऊ शकते व आपले नुकसान होऊ शकते. तसेच काही मोबाईल अॅपदेखील आहेत. पण, ते डाऊनलोड करून वापरण्यापूर्वी त्याची वैधता तपासून घेणे आवश्यक आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.