Maharashtra Politics : विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळतील ‘इतक्या’ जागा? उदयनराजेंनी सांगितला आकडा

118

भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या सर्वच जागा जिंकणार असल्याचा दावा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. ते म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीत राज्यात २८८ आमदार आणि लोकसभा निवडणुकीत ४८ खासदार भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट मिळून निवडून आणणार आहोत. त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या टिफीन बैठकीत खासदार उदयनराजे यांनी या दावा केला आहे.

योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचायला हव्यात

उदयनराजे म्हणाले की, ‘आगामी निवडणुका एकसंधपणे लढवून लोकसभा व विधानसभा निवडणुकांत भाजपचे उमेदवार निवडून आणले पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या विकास योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचायला हव्यात. राज्यातील ७० टक्के लोक भाजपच्या बाजूने आहेत. देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आदींना मी तलवार आणि वाघनखं भेट दिले आहेत. कारण शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यानेच स्वराज्य उभे केले आहे. या पद्धतीने आपले सरकार उभे राहिले पाहिजे. यासाठीच मी त्यांना भेटलो आहे.’

(हेही वाचा Online Fraud : मागवला ९० हजारांचा कॅमेरा, पण हातात आल्या बिया!; नेमका प्रकार काय?)

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये उदयनराजेंना आम्हाला पाहायचे आहे

काँग्रेसवर टीका करताना उदयनराजे म्हणाले, ‘गेली ७० वर्षे काँग्रेसने देशाला प्रगतीपासून वंचित ठेवले. महात्मा गांधींनी सत्तेचे विकेंद्रीकरण करा, असा संदेश दिला होता; परंतु तो संदेश फक्त एका कुटुंबापुरता मर्यादित ठेवण्याचे काम काँग्रेसने केले आहे.’ भाजप जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे म्हणाले, उदयनराजे भोसले यांना नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आम्हाला पाहायचे आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागून विविध राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्या सर्वांना करावयाचे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.