Chatgpt : माणसांपेक्षा जास्त चुका करतंय चॅटजीपीटी; का वैतागलेत नेटकरी? 

133

Chatgpt सध्या व्हायरल होणारे ए.आय अर्थात चॅट रोबोट आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे तंत्रज्ञान अस्तित्वात आणले आहे. सुरुवातीला चांगलाच गाजावाजा होत असलेले हे तंत्रज्ञान आता नेटकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. सुरुवातीला हवेहवेसे वाटणारे हे तंत्रज्ञान आता नकोसे वाटू लागले आहे.

गेल्या एका वर्षात Chatgptने बरीच प्रसिध्दी मिळवली होती. परंतु, आता Chatgpt वरील नेटकऱ्यांचा विश्वास उडत चालला आहे. काही काळापूर्वी वापरकर्त्यांनी सोशल मीडिया आणि डेव्हलपर फोरमवर, “एआय काही आठवड्यांपूर्वीच्या तुलनेत आता खूप चुका करत आहे’, असे म्हटले आहे.

“Chatgptला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं, अगदी लहान मुलांना लाजवेल अशी आहेत आणि हे तंत्रज्ञान एआय असूनही  माणसांपेक्षा जास्त चुका करत आहे, हे Chatgptकडून अपेक्षित नव्हते.

chat

(हेही वाचा Hate Speech : आझम खानला न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.