SP Hinduja : हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे निधन; वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

१९८६ मधील बोफोर्स घोटाळ्यात (SP Hinduja) श्रीचंद, गोपीचंद आणि प्रकाश हिंदुजा यांचीही नावे पुढे आली होती. या घोटाळ्यात स्वीडिश कंपनी बोफोर्सवर १९८६ मध्ये भारत सरकारला १.३ अब्ज डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप होता.

126
SP Hinduja : हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे निधन; वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एसपी हिंदुजा यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार १७ मे रोजी हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष श्रीचंद परमानंद हिंदुजा म्हणजेच एसपी हिंदुजा (SP Hinduja) यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते. लंडन, युनायटेड किंग्डम येथे त्यांचे निधन झाले. एसपी हिंदुजा यांना स्मृतिभ्रंश (डिमेंशिया) हा आजार झाला होता. हिंदुजा यांच्या निधानाने उद्योग क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे.

(हेही वाचा – The Kerala Story : आता ब्रिटनमध्ये चित्रपट होणार प्रदर्शित; काय म्हणाले दिग्दर्शक?)

२८ अब्ज पौंड ($३३ अब्ज) पेक्षा जास्त संपत्तीसह, श्रीचंद, गोपीचंद आणि हिंदुजा कुटुंब यूकेमधल्या श्रीमंतांच्या यादीत शीर्षस्थानी आहे. हिंदुजा कुटुंबाचा व्यवसाय बँकिंग, रसायने आणि आरोग्यसेवा यासारख्या उद्योगांमध्ये पसरलेला आहे. (SP Hinduja)

एसपी हिंदुजा (SP Hinduja) यांच्या कुटुंबाने एका निवेदनात म्हटले आहे की, “आमचे कुटुंबीय आणि हिंदुजा समुहाचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे निधन झाल्याची घोषणा करताना गोपीचंद, प्रकाश, अशोक आणि संपूर्ण हिंदुजा कुटुंबाला अतिशय दुःख होत आहे. ते कुटुंबाचे गुरू होते. त्यांचा यजमान देश यूके आणि त्यांचे मूळ देश भारत यांच्यात मजबूत संबंध निर्माण करण्यात त्यांनी आपल्या भावांसोबत खूप महत्त्वाची भूमिका बजावली.”

हेही पहा – 

१९८६ मधील बोफोर्स घोटाळ्यात (SP Hinduja) श्रीचंद, गोपीचंद आणि प्रकाश हिंदुजा यांचीही नावे पुढे आली होती. या घोटाळ्यात स्वीडिश कंपनी बोफोर्सवर १९८६ मध्ये भारत सरकारला १.३ अब्ज डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप होता. यात तिन्ही भावांनी मदत केल्याचाही आरोप होता. या तिन्ही भावांवर सीबीआयने ऑक्टोबर २००० मध्ये आरोप लावले होते. मात्र, २००५ साली दिल्ली न्यायालयाने पुराव्याअभावी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. (SP Hinduja)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.