CM Eknath Shinde : उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सुविधा द्या; मुख्यमंत्री शिंदे यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश

तसेच या वाहतूक पोलिसांचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांना छत्री, जागोजागी उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी तात्पुरत्या शेड्स आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची सूचना केली.

34
CM Eknath Shinde : उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सुविधा द्या; मुख्यमंत्री शिंदे यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश

मे महिन्यातील रणरणत्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेडस तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवार १७ मे रोजी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – Karnataka Election 2023 : मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या, तर उपमुख्यमंत्रीपदी डीके शिवकुमार; २० मे रोजी शपथविधी)

बुधवार १७ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) ठाणे येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस त्यांना दिसले. यातील अनेक पोलीस हे वयाने ज्येष्ठ असूनही भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी पाहिले. पोलिसांची ही अवस्था पाहून संवेदनशील मनाच्या एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केला आणि यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश दिले.

हेही पहा – 

तसेच या वाहतूक पोलिसांचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांना छत्री, जागोजागी उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी तात्पुरत्या शेड्स आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची सूचना केली. (CM Eknath Shinde)

यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना तसेच कोणताही गंभीर आजार असलेल्या वाहतूक पोलिसांना उन्हाच्या जागी कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये. मुख्यमंत्र्यांच्या या सूचना अमलात आल्यानंतर वाहतूक पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे. (CM Eknath Shinde)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.