Department of Health : आरोग्य विभागाचे दोन्ही संचालकपद पदमुक्त

दोघांपैकी एका अधिकाऱ्याने ऐन कोविड काळात आरोग्यसेवा उत्तम सांभाळली होती

83
Department of Health : आरोग्य विभागाचे दोन्ही संचालकपद पदमुक्त
Department of Health : आरोग्य विभागाचे दोन्ही संचालकपद पदमुक्त

ठाणे येथील कळवा रुग्णालयातील लागोपाठ १८ रुग्णांच्या मृत्यूने राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केलेले असतानाच आरोग्य विभागाच्या प्रभारीपदी कार्यरत असलेल्या दोन्ही संचालकांना पदमुक्त करण्यात आले आहे. डॉ. स्वप्निल लाळे आणि डॉ. नितीन आंबाडेकर यांची गेल्या आठवड्यात आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी तडकाफडकी बदली केली. दोघांपैकी एका अधिकाऱ्याने ऐन कोविड काळात आरोग्यसेवा उत्तम सांभाळली होती.

दुसऱ्या अधिकाऱ्याने आरोग्य विभागात शिस्तबद्धता आणून दिली होती. त्यामुळे आरोग्य मंत्र्याच्या निर्णयावर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे. डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाचा कार्यभार स्विकारल्यापासून अनेकदा त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस गोवरची साथ, कोविड काळात थांबलेले लसीकरण, यामुळे अनेकदा आरोग्य विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.

(हेही वाचा – Asian Games 2023 : विनेश फोगाट दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर)

अनेकदा डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून कार्यभार काढण्याच्या बातम्यांनाही उधाण आले होते. त्यात डॉ. नितीन आंबाडेकर दिल्लीतील एम्स रुग्णालयात कार्यभार सांभाळत होते. त्यांनी केंद्रीय पातळीवर अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. राज्यतील वरिष्ठाच्या आग्रहावरून त्यांनी राज्यातील प्रभारी संचालक पद स्विकारले होते. राज्यातील महत्वाची दोन संचालक पदावरील महत्वाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या वागणुकीमुळे आता मोठया प्रमाणात टीका होऊ लागली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.