ICC ODI Cricket World Cup 2023 : भारत-पाक सामन्याची तिकिटं कधी, कुठे मिळणार?

५ ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे

111
ICC ODI Cricket World Cup 2023 : भारत-पाक सामन्याची तिकिटं कधी, कुठे मिळणार?
ICC ODI Cricket World Cup 2023 : भारत-पाक सामन्याची तिकिटं कधी, कुठे मिळणार?
  • ऋजुता लुकतुके

भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तिकीट विक्री कधी सुरू होणार हे आयसीसीने जाहीर केलं आहे. बघूया भारताच्या सामन्यांची तिकिटं कुठे आणि कधी मिळणार? ५ ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. आधीच्या स्पर्धेतील अंतिम फेरीतले दोन संघ न्यूझीलंड आणि इंग्लंड अहमदाबादमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. एरवी विश्वचषक स्पर्धेच्या एक वर्षं आधी तिकीट विक्री सुरू होते. पण, यंदा विविध कारणांमुळे रखडलेली तिकीट विक्री आता सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे.

आयसीसीने तिकीट विक्रीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईत ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. तर भारत, पाकिस्तान दरम्यानचा सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादला होणार आहे. पण, चाहत्यांना लगेचच या सामन्यांची तिकिटं खरेदी करता येणार नाहीत. आधी तिकीट खरेदीसाठी आयसीसी साईटवर नोंदणी करावी लागेल. आणि मग तिकीट विक्री खुली झाल्यावर त्यांना तिकीट खरेदी करता येईल. प्रत्यक्ष तिकीट विक्री २५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. आणि ही विक्री टप्याटप्याने होईल. ही प्रक्रिया समजावून सांगणारं ट्विट आयसीसीने १५ ऑगस्टला केलं आहे.

(हेही वाचा – Crime : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट करणाऱ्या मुंबईतील दोन तरुणांना अटक)

भारताच्या सर्व सामन्यांची तिकिटं नेमकी कधी उपलब्ध होणार ते पाहूया, भारताच्या गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम इथं होणाऱ्या सामन्यांची तिकिटं ३० ऑगस्टला उपलब्ध होतील. चेन्नई, दिल्ली आणि पुण्यातील सामन्यांची तिकिटं ३१ ऑगस्टला मिळतील. धरमशाळा, मुंबई आणि लखनौची तिकिटं १ सप्टेंबरला मिळतील. बंगळुरू आणि कोलकात्यातील तिकिटं २ सप्टेंबरला मिळतील. तर भारताच्या अहमदाबादमधील सामन्यांची तिकिटं (यात पाकिस्तान विरोधातील सामनाही आला) ३ सप्टेंबरपासून मिळतील. स्पर्धेचे उपान्त्य आणि अंतिम फेरीतील सामन्यांची तिकिटं १५ सप्टेंबरला उपलब्ध होतील. प्रत्यक्ष तिकीट खरेदी करण्यापूर्वी चाहत्यांना आयसीसीच्या एका वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. https://cricketworldcup.com/register ही ती वेबसाईट आहे. आणि तिथे लवकर नोंदणी करणाऱ्यांना तिकीट विक्रीविषयीचे अपडेट लवकर मिळतील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.