Airpods Manufacturing in Hyderabad : हैद्राबादमध्ये बनणार ॲपलचे एअरपॉड्स

डिसेंबर २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणातील उत्पादन सुरू होईल असा अंदाज आहे

125
Airpods Manufacturing in Hyderabad : हैद्राबादमध्ये बनणार ॲपलचे एअरपॉड्स
Airpods Manufacturing in Hyderabad : हैद्राबादमध्ये बनणार ॲपलचे एअरपॉड्स
  • ऋजुता लुकतुके

ॲपल कंपनीने फॉक्सकॉनच्या प्रस्तावित हैद्राबादमधील कारखान्यात ॲपल फोनबरोबरच एअरपॉड उत्पादन सुरू करण्याची तयारी चालवली आहे. आयफोन बरोबरच आता फॉक्सकॉनच्या हैद्राबाद कारखान्यात एअरपॉड्सचं उत्पादनही सुरू होणार आहे. डिसेंबर २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणातील उत्पादन सुरू होईल असा अंदाज आहे. एअरपॉड्स म्हणजे आयफोनसाठी असलेले वायरलेस इयरफोन. अलीकडेच फॉक्सकॉन कंपनीने भारतात तेलंगाणामध्ये आधीच्या १५० दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या वर आणखी ४०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. ही गुंतवणूक एअरपॉड्‌सच्या तसंच एसई प्रकारच्या आयफोन निर्मितीसाठी वापरली जाणार आहे.

वायरलेस ईयरफोन क्षेत्रात ॲपलची मक्तेदारी आहे. आणि २०२२ च्या शेवटच्या तिमाहीत ३६ टक्के बाजारपेठ ॲपलने काबीज केल्याचं स्पष्ट झालं होतं. ॲपल नंतर सॅमसंगचा वाटा ७ टक्के आहे. इतकी तफावत ॲपल आणि इतर कंपन्यांमध्ये आहे. त्यानंतर शिओमी, बोट आणि ओपो यांचा क्रमांक लागतो. खरंतर ओपो कंपनीने वायरलेस ईयरफोनची सुरुवात केली. त्याचवेळी आयफोन एसई या चौथ्या पिढीचे आयफोनही आता हैद्राबादमध्ये बनणार आहेत. आणि या नवीन आयफोनमध्ये युएसबी पोर्ट दिला जाऊ शकतो. तसंच ॲपल फोनमध्ये पहिल्यांदाच फेस आइडेंटिफिकेशनची सुविधाही दिली जाणार अशी चर्चा आहे.

(हेही वाचा – Western Local Train Block : आठवड्याच्या मध्येच पश्चिम रेल्वेचा विशेष ब्लॉक; डहाणू लोकल आज अंशत: रद्द)

गेल्यावर्षीपासून ॲपल कंपनीने आपल्या फोनच्या उत्पादनासाठी चीनला मागे टाकून भारताशी अधिकाधिक करार करण्याचं धोरण ठेवलं आहे. त्यानुसार, काही प्रमाणात आयफोनचं उत्पादन भारतात सुरूही झालं आहे. कोरोना नंतरच्या काळात चीनमधील बदलेली परिस्थिती आणि तिथली विस्कळीत झालेली पुरवठा साखळी यामुळे ॲपल कंपनीने हा निर्णय घेतला आहे. पण, चीननंतर त्यांची पसंती भारताला मिळताना दिसतेय.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.