Gym For Women : मुंबईत आता महिलांकरता फिरते जिम

मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून झोपडपट्टीतील महिलांसाठी फिरत्या जिमची व्यवस्था करण्यात येणार आहे

171
Gym For Women : मुंबईत आता महिलांकरता फिरते जिम
Gym For Women : मुंबईत आता महिलांकरता फिरते जिम

सचिन धानजी

मुंबईत आदित्य ठाकरेंनी ओपन जिमची संकल्पना राबवली असली तरी त्याची फारशी अंमलबजावणी होऊ शकली नाही. मात्र, बदलत्या जिवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारांबाबत महिलांमध्ये अधिक सतर्कता बाळगण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून झोपडपट्टीतील महिलांसाठी फिरत्या जिमची (Gym For Women) व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी उपनगराकरता प्रायोगिक तत्वावर एका फिरत्या जिमची (Gym For Women) सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून या जिमला मिळणारा प्रतिसाद पाहता अशाप्रकारच्या सुविधा अन्य ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा महापालिका प्रशासनाचा मानस आहे.

घरोघरी फिटनेस उपक्रम

उपनगर जिल्ह्यातील महिलांसाठी फिरती व्यायामशाळा (जिम) सुरु करण्याची संकल्पना उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडली असून त्यानुसार बसमध्ये या जिमची रचना केली जाणार आहे. झोपडपट्टी भागातील महिलांना या व्यस्त जीवनात फिटनेला अधिक वेळ देता येत नाही. त्यामुळे या झोपडपट्टीतील महिलांना घरोघरी फिटनेसची सुविधा प्राप्त व्हावी आणि त्यांना याबाबतची माहिती व्हावी म्हणून ही संकल्पना राबवली जात आहे. घरोघरी फिटनेस उपक्रम घेणे आणि महिलांना माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी जागरुकता आणण्यासाठी आणि आरोग्यासाठी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी ही नाविन्यपूर्ण योजना असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा-Israel-Hamas Conflict: इस्त्रायल लष्कराला अल शिफा रुग्णालयात सापडला ‘दहशतवादी बोगदा’, ‘x’वर व्हिडियो शेअर करून दिली महत्त्वाची माहिती)

जिल्हा नियोजन विभागाकडून निधी 

एका बसमध्ये व्यायामांचे साहित्य उपलब्ध करून त्यामध्ये बस चालक, ट्रेनर व इतर एका व्यक्तींचा समावेश असेल. त्यामुळे एका बसमध्ये ही फिरती व्यायामशाळा असेल आणि उपनगरांमधील प्रत्येक झोपडपट्टीत नेमून दिलेल्या वेळेत जावून त्या भागातील महिलांना फिटनेसची माहिती देऊन त्यांना शिकवले जाईल. अशाप्रकारची एक फिरती व्यायामशाळा खरेदी करण्यासाठी उपनगर जिल्हा नियोजन विभागाकडून निधी उपलब्ध झाला आहे. त्यानुसार महापालिकेच्यावतीने या फिरत्या जिमची बांधणी बस सांगाडा घेऊन त्यात केली जाणार आहे. यासाठी सुमारे ७५ लाख रुपयांचा खर्च केला जाणार असून पुढील तीन वर्षांची देखभाल याकरता  १ कोटी ४२ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे त्या फिरत्या व्यायामशाळेची खरेदी आणि तीन वर्षांची देखभाल आदींकरता २ कोटी १९ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी बी द चेंज ही कंपनी पात्र ठरली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.