Virender Sehwag : भारतीय संघाच्या फलंदाजीवर सेहवागची नाराजी; म्हणाला …

141
Virender Sehwag : भारतीय संघाच्या फलंदाजीवर सेहवागची नाराजी; म्हणाला ...

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले. हा सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी होती. दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २० वर्षांनी आमनेसामने आले होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने उत्तम खेळ करत हा अंतिम सामना जिंकला. (Virender Sehwag)

दरम्यान, भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) भारतीय फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुलच्या फलंदाजीवर नाराजी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – Rohit Sharma ने सांगितलं अंतिम सामन्यातील पराभवाचं कारण; म्हणाला…)

काय म्हणाला सेहवाग?

विराट आणि राहुलने अत्यंत संथपणे फलंदाजी केली. त्यांनी धावा करण्यासाठी एकदाही धोका पत्करला नाही. त्यामुळे भारताला २४०च धावा करता आल्या. विराट आणि राहुलने थोडी आक्रमक खेळी केली असती तर भारत सुस्थितीत असता, अशी प्रतिक्रिया सेहवागने (Virender Sehwag) दिली आहे.

पुढे बोलतांना सेहवाग (Virender Sehwag) म्हणाला की; “भारताच्या दोन विकेट पडल्यानंतर, कोहली आणि राहुलला वाटले की, खेळपट्टी संथ आहे. त्यामुळे २५० धावांचं लक्ष्य मनात ठरवून ते संथ खेळू लागले. त्यांनी एकही धोका पत्करला नाही. जेव्हा दुसरा पॉवरप्ले चालू होता ज्यामध्ये पाच खेळाडू वर्तुळात होते. तेव्हा भारताला प्रत्येक षटकांत कोणताही चौकार किंवा षटकार न मारता किमान ४-५ धावा करता आल्या असत्या. दोघांपैकी एकाने आक्रमक खेळी करायला हवी होती. राहुलने १०७ चेंडू खेळून केवळ ६६ धावा केल्या. तो शेवटपर्यंत टिकून खेळला असता तर कदाचित त्याने धावा आणि चेंडूंमधलं अंतर कमी केलं असतं. पण स्टार्कने एवढा अप्रतिम चेंडू टाकला की तो (राहुल) काहीही करू शकला नाही,” असं सेहवाग (Virender Sehwag) म्हणाला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.