Dr. Rajendra Gavit: पालघरचे खासदार डॉ. राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश

98
Dr. Rajendra Gavit: पालघरचे खासदार डॉ. राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश

पालघरचे खासदार डॉ. राजेंद्र गावित यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशीष देशमुख, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी खासदार गावित यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले. (Dr. Rajendra Gavit)

गावित यांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आमदार, खासदार आणि आदिवासी विकास मंत्री असा राजकारणातील मोठा अनुभव गाठीशी असणाऱ्या राजेंद्र गावित यांचा एका अर्थी भाजपामध्ये पुनर्प्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीनेच गावित यांचा भाजपा प्रवेश झाला आहे. गावित यांच्या अनुभवाचा फायदा दिल्लीपेक्षा राज्यात अधिक होणार आहे. या दृष्टीने त्यांच्या संमतीनेच पालघरमध्ये भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली आहे. गावित यांच्या कार्यकर्तृत्वाचा यथोचित सन्मान राखला जाईल असेही फडणवीस यांनी नमूद केले.  (Dr. Rajendra Gavit)

(हेही वाचा –Team India Jersey: 2007 ते 2024 या कालावधीत T-20 विश्वचषकात भारताने किती वेळा बदलल्या जर्सी? )

जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आश्वासन
गावित यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. फडणवीस हे राजकारणात दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत. यापुढे भाजपा नेतृत्वाची जी जबाबदारी सोपवेल ती प्रामाणिकपणे पार पाडेन, असेही गावित यांनी सांगितले.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.