Gurpatwant Singh Pannu : अमेरिकेने केलेल्या आरोपांविषयी भारत गंभीर; उचलले ‘हे’ पाऊल

Gurpatwant Singh Pannu भारताने पन्नू प्रकरणातील अमेरिकेने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे.

216
Gurpatwant Singh Pannu : अमेरिकेने केलेल्या आरोपांविषयी भारत गंभीर; उचलले 'हे' पाऊल
Gurpatwant Singh Pannu : अमेरिकेने केलेल्या आरोपांविषयी भारत गंभीर; उचलले 'हे' पाऊल

ब्रिटीश वृत्तपत्राने दावा केला आहे की, भारताने पन्नू प्रकरणातील अमेरिकेने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. ब्रिटिश वृत्तपत्र ‘फायनान्शियल टाईम्स’च्या (Financial Times) एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, खालिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याला अमेरिकेत ठार मारण्याचा कट होता, जो अमेरिकेने हाणून पाडला. भारताने हा मुद्दा अमेरिकेकडे उपस्थित केला आहे.

(हेही वाचा – Highway Closed: इंदौर-पुणे महामार्ग बंद; मनमाडचा ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज कोसळला)

भारताने स्थापन केले उच्चस्तरीय चौकशी समिती 

खलिस्तानी दहशतवादी (Khalistani terrorists) गुरपतवंत सिंग पन्नूच्या दाव्यावर भारत सरकारने (Government of India) पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, आम्ही अमेरिकेच्या (USA) गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीला गांभीर्याने घेतले आहे. याच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) बुधवारी याविषयीचे निवेदन जारी केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत-अमेरिका सुरक्षा सहकार्याबाबत नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान संघटित गुन्हेगार, बंदूकधारी, दहशतवादी आणि इतरांमधील संबंधांबाबत अमेरिकेच्या बाजूने माहिती मिळाल्यानंतर भारताने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे.

संबंधित विभाग आधीच चौकशी करत आहेत

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (arindam bagchi) यांनी भारत-अमेरिका सुरक्षा सहकार्याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर दिले. ते म्हणाले, “आम्ही आधीच सांगितले आहे की, द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याबाबत झालेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेने संघटित गुन्हेगार, बंदूकधारी, दहशतवादी आणि इतरांमधील संबंधांबाबत काही माहितीची देवाणघेवाण केली. आम्ही असेही सूचित केले होते की, भारत अशा प्रकारच्या सूचना गांभीर्याने घेतो. कारण या गोष्टींचा आपल्या राष्ट्रीय सुरक्षेवरही परिणाम होतो आणि संबंधित विभाग आधीच या प्रकरणाची चौकशी करत आहेत.”

(हेही वाचा – Sheetal Devi : भारताची पॅरा – तिरंदाज शीतल देवी जागतिक पॅरा क्रमवारीत अव्वल स्थानावर)

समितीच्या निष्कर्षांच्या आधारे कारवाई करणार

18 नोव्हेंबर रोजी भारत सरकारने या प्रकरणाच्या सर्व संबंधित पैलूंवर लक्ष ठेवण्यासाठी एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीच्या निष्कर्षांच्या आधारे भारत सरकार आवश्यक ती कारवाई करेल. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या (Gurpatwant Singh Pannu) हत्येचा कट अमेरिकेने हाणून पाडल्याचे अज्ञात अधिकाऱ्यांच्या हवाल्याने फायनान्शियल टाइम्सने वृत्त दिल्यानंतर काही दिवसांनी हे समोर आले आहे. पन्नूला संपवण्याच्या कटात भारत सरकार सहभागी असल्याच्या कारणाने अमेरिकन सरकारने भारताला ‘इशारा’ दिल्याचे वृत्तही दैनिकाने दिले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.