Gudhipadva 2024: गुढीपाडव्यानिमित्त मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल; जाणुन घ्या पर्यायी मार्ग

142
Gudhipadva 2024: गुढीपाडव्यानिमित्त मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल; जाणुन घ्या पर्यायी मार्ग
Gudhipadva 2024: गुढीपाडव्यानिमित्त मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल; जाणुन घ्या पर्यायी मार्ग

गुढीपाडवा (Gudhipadva 2024) हा हिंदूंसाठी , प्रामुख्याने मराठी आणि कोकणी वारसा असलेल्या चंद्रसौर नवीन वर्षाची सुरुवात करणारा वसंतोत्सव आहे. चंद्रसौर हिंदू कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याच्या चैत्राच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. या निमित्ताने (Gudhipadva 2024) मुंबई, ठाणे, डोंबिवली या भागांमध्ये शोभयात्रा निघतात. या पार्श्वभुमीवर शहरांतील वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्याशिवाय मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क येथे पार पडणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्याच्या (Gudhipadva 2024) निमित्तानंही शहरातील काही वाहतूक मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यासोबत काही मार्ग पर्यायी वाटेने वळवण्यात आले आहेत. (Gudhipadva 2024)

गिरगावात निघणाऱ्या शोभायात्रेच्या धर्तीवर या भागातील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण मुंबईमध्ये गिरगावची शोभायात्रा आणि त्यामुळे प्रभावित भाग वगळता उर्वरित भागात वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहिल. तर सायंकाळ्यच्या सुमारास दक्षिण मध्य मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. (Gudhipadva 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण)

पश्चिम आणि पूर्व द्रूतगती मार्गांवर होणारी वाहतूक अंदाजात घेता मंगळवारी ९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतूकीसंदर्भातील नियम लागू असतील. या नियमाअंतर्गत काही ठिकाणांवर वाहनांच्या पार्किंगवर बंदी असेल. एसवीएस रोडवर सिद्धीविनायक मंदिर चौक ते येस बँकेच्या जंक्शनपर्यंत नो पार्किंग असेल. केळुसकर रोडवरही वाहनं उभी करण्यास मनाई अस्ले. त्याशिवाय एम बी राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दिलीप गुप्ते मार्ग, एन सी केळकर मार्गांवर No Parking लागू असेल. (Gudhipadva 2024)

(हेही वाचा –K. K. Muhammed: मुस्लिमांनी काशी, मथुरा सोडावी – ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद)

एसवीएस रोडवर सिद्धीविनायक मंदिर चौक ते येस बँकेच्या जंक्शनवरून प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्ग म्हणून सिद्धीविनायक मंदिर चौकापासून एस के बोले मार्ग आगर बाजार, पोर्तुगीज चर्चवरून डावं वळण घेत गोखले मार्गानं पुढे जावं. राजा बडे चौक ते केळुसकर मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी एलजे मार्ग, गोखले मार्ग, स्टीलमॅन जंक्शनहून उडवं वळण घेत एसवीएस मार्ग गाठावा. (Gudhipadva 2024)

ठाण्याच्या वाहतुकीतील बदल

ठाणे शहरातही मंगळवारी गुढीपाडव्याच्या निमित्तानं स्वागत यात्रा निघणार आहेत. यादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरात काही वाहतूक नियम लागू असतील. ठाणे शहरातील कोर्टनाका चौक येथून जांभळीनाका आणि बाजारपेठेच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ प्रवेशबंदी असेल. ही वाहनं आनंद आश्रममार्गे, टॉवरनाका, तलावपाळीमार्गावरून पुढे वाहतूक करतील. खारकरआळी पासून जांभळीनाक्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीस महाजनवाडी सभागृहाजवळ प्रवेशबंदी राहील. ही वाहतूक महाजनवाडी सभागृहापासून कोर्टनाकामार्गे वळवण्यात येईल. (Gudhipadva 2024)

(हेही वाचा –State Information Commission : सरकारी माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास शासकीय यंत्रणांकडून टाळाटाळ; राज्य माहिती आयोगाचे ताशेरे)

ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, डॉ. मूस चौक येथून मुख्य बाजारपेठमार्गे जांभळीनाका येथे वाहतूक करणाऱ्या वाहनांना ए-वन फर्निचर दुकानापाशी प्रवेशबंदी राहील. ही संपूर्ण वाहतूक राघोबा शंकर रोड, माता रमाबाई चौकमार्गे पुढे जातील. गोखले रस्त्यापासून येथून राम मारुती रोडच्या दिशेनं येणाऱ्या वाहनांना तीन हात नाकामार्गे पुढे जावं लागेल. तर, तीन हात नाका, हरिनिवास किंवा मल्हार सिनेमामार्गे ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या बसगाड्यांना तीन हात नाका येथे प्रवेशबंदी असेल. या बस नितीन कंपनी, अल्मेडा रोड, खोपट, टेंभीनाकामार्गे वळवण्यात येतील. (Gudhipadva 2024)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.