K. K. Muhammed: मुस्लिमांनी काशी, मथुरा सोडावी – ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद

195
K. K. Muhammed: मुस्लिमांनी काशी, मथुरा सोडावी - ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद
K. K. Muhammed: मुस्लिमांनी काशी, मथुरा सोडावी - ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद

भांडारकर प्राच्यविद्या (K. K. Muhammed) संशोधन मंदिर येथे आयोजित ‘भारत ः विरासत आणि संस्कृती’ या व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद (K. K. Muhammed) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘‘आधुनिक समाज म्हणून आपण ऐतिहासिक तथ्ये स्वीकारायला हवीत. मुस्लिमांसाठी ज्याप्रमाणे मक्का आणि मदिना पवित्र आहेत. त्याचप्रमाणे हिंदूंसाठी काशीतील ज्ञानवापी (Gyanvapi) आणि मथुरेतील (Mathura) कृष्ण जन्मस्थळ पवित्र आहेत. मुस्लिमांच्या दृष्टीने तेथे फक्त एक मशीद आहे. त्यामुळे त्यांनी ती स्वतःहून हिंदूंना सुपूर्त करावी आणि हिंदूंनीही राष्ट्रहितासाठी येथेच थांबावे.’’ असं ते म्हणाले आहेत. (K. K. Muhammed)

(हेही वाचा –Accident in Nagpur: एका ट्रकने १२ गाड्यांना उडवलं; घटनेचा व्हिडीओ व्हायरल)

… तर देशात हाहाकार माजेल

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण उत्तर भारताचे माजी संचालक असलेले मोहम्मद (K. K. Muhammed) यांनी चंबळ खोऱ्यातील बटेश्वर मंदिर शृंखलेचे पुनर्निर्माण आणि राम मंदिराच्या सर्वेक्षणासंदर्भात माहिती दिली. ते (K. K. Muhammed) म्हणाले, ‘‘काशी आणि मथुरेतील जन्मस्थळाशी ना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा संबंध आहे, ना एखाद्या औलियाचा संबंध आहे, परंतु हिंदूंसाठी ते देवांचे जन्मस्थान आहे. हिंदू समुदायाने मध्ययुगीन कालखंडात उद्‌ध्वस्त झालेली तीन ते चार हजार मंदिरे मागितली नाहीत. त्यांनी तसे केले तर देशात हाहाकार माजेल. देशाच्या हिताच्या दृष्टीने हिंदूंनी येथेच थांबावे.’’ असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (K. K. Muhammed)

(हेही वाचा – baby food: सॅरलॅक नको! आता घरच्या घरीच बनवा बाळाचा पौष्टिक आहार)

“मध्ययुगीन कालखंडात झालेल्या आक्रमणाला आणि मंदिर विध्वंसासाठी आजचे मुस्लिम जबाबदार नाहीत. मात्र, या आक्रमणाचे कोणत्याही प्रकारे समर्थन करणारे नक्कीच दोषी आहेत. माझ्या पूर्वजांकडून भारतातील हजारो मंदिरांचा विध्वंस झाला. त्याचा आत्मक्लेष म्हणून माझ्या हातून हे प्राचीन मंदिरांच्या पुनर्निर्माणाचे कार्य झाले.” अशी भावना के. के. मोहम्मद यांनी व्यक्त केली. (K. K. Muhammed)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.