Deep Fake Video : बॉलिवूड पाठोपाठ शेअर्स बाजाराला डीपफेक तंत्रज्ञानाचा फटका

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे सीईओ सुंदररामन राममूर्ती यांचा व्हिडीओ व्हायरल

104
Deep Fake Video : बॉलिवूड पाठोपाठ शेअर्स बाजाराला डीपफेक तंत्रज्ञानाचा फटका

बॉलिवूडमधील कलाकारांपाठोपाठ शेअर्स बाजारातील तज्ज्ञाचे डीपफेकच्या (Deep Fake) माध्यमातून व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे एमडी आणि सीईओ सुंदररामन राममूर्ती यांचा गुंतवणूक करण्याबाबतचा बनावट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बनावट व्हिडीओ प्रकरणी मुंबईतील सायबर सेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बनावट व्हिडिओमध्ये फसव्या जाहिरातींद्वारे जनतेची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. दक्षिण प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (Deep Fake Video)

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे एमडी आणि सीईओ सुंदरराजन राममूर्ती यांचा स्टॉक, चलन, सोने आणि विदेशी चलन बाजारात गुंतवणुकीचा सल्ला देणारा व्हिडिओ (Deep Fake Video) फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु हा व्हिडीओ खरा नसून डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बनावट व्हिडीओ तयार करण्यात आलेला असल्याचे समोर आले आहे. एका अज्ञात फेसबुक खातेदाराने सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने बनावट जाहिराती पसरवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. (Deep Fake Video)

(हेही वाचा – Thomas Cup 2024 : प्रतिष्ठेच्या थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा पुरुष संघ बाद फेरीत)

हा प्रकार बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे एमडी आणि सीईओ सुंदरराजन राममूर्ती याच्या निदर्शनास आल्यानंतर अक्षित जैन यांनी त्यांच्या वतीने दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ही तक्रार गांभीर्याने घेत दक्षिण सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमांतर्गत, आयटी कायद्याच्या कलम ६६सी, ६६डी तसेच कलम ४१९, ४२०, ४६५, ४६८ आणि ४७१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Deep Fake Video)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.