Gallantry Award 2025 : राज्यातील ४९ पोलिसांना शौर्य पदक; कुंभारे, रेड्डी राष्ट्रपती सेवा पदकाचे मानकरी; वाचा संपूर्ण यादी

224
स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील 49 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी 7 पोलिसांना शौर्य पदक, 3 पोलिसांना उल्लेखनिय सेवेसाठी राष्ट्रपती पदक (Police President Medal) देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरूवारी पोलीस पदकांची (Police Medal) घोषणा केली. (Gallantry Award 2025)

(हेही वाचा – Ganeshmurti Exhibition : दिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये 16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री)

असाधारण शौर्य दाखविणाऱ्या पोलीस, गृहरक्षक आणि अग्निशमन विभागातील (Fire Brigade) कर्मचाऱ्यांना दरवर्षी शौर्य पदक (जीएम) प्रदान करण्यात येते. गृहमंत्रालयाने गुरूवारी देशातील पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक व नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण 1 हजार 90 जणांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर केली. त्यात 233 जणांना शौर्य पदके, 99 जणांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक (पीएसएम) आणि 758 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम) जाहीर करण्यात आले आहे. या 233 शौर्य पदकांपैकी 54 पदके नक्षलवाद प्रभावित भागात कार्यरत पोलिसांना जाहीर झाली आहेत. 152 पोलीस जम्मू आणि काश्मीर क्षेत्रातले आहेत. ईशान्य भारत क्षेत्रातील 3 आणि इतर क्षेत्रातील 24 जणांना पदक जाहीर झाले आहेत.


स्वातंत्र्यदिन 2025 निमित्त जाहीर शौर्य पदक विजेत्यांच्या नावांची यादी पुढीलप्रमाणे : 
पोलीस दल (महाराष्ट्र)
1. नेताजी सुखदेव बंडगर – सहाय्यक पोलीस निरीक्षक -शौर्यपदक
2. मनोहर कोटला महाका – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक – शौर्यपदक
3. मनोहर लचमा पेंडम – हेड कॉन्स्टेबल – शौर्यपदक
4. प्रकाश ईश्वर कन्नाके -पोलीस कॉन्स्टेबल – शौर्यपदक
5. अतुल सत्यनारायण येगोळपवार –पोलीस कॉन्स्टेबल – शौर्यपदक
6. हिदायत सददुल्ला खान – पोलीस कॉन्स्टेबल -शौर्यपदक
7. सुरेश लिंगाजी तेलमी -पोलीस कॉन्स्टेबल – शौर्यपदक (मरणोत्तर)
(हेही वाचा – Coastal Road Project पूर्णपणे खुला; शुक्रवारपासून वाहतुकीसह पर्यटनाचाही…)

 

अग्निशमन दल (महाराष्ट्र)
1. संतोष रावसाहेब इंगोले – वरिष्ठ अग्निशमन स्थानक अधिकारी – शौर्यपदक
2. योगेश हनुमंत कोंडावार – अग्निशमन सेवेतील जवान – शौर्यपदक
3. सुनील सुरेश देसले – अग्निशमन सेवेतील जवान – शौर्यपदक

राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदका (पीएसएम) चे मानकरी ठरलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे :
पोलीस दल (महाराष्ट्र)
1. अनिल दशरथराव कुंभारे, पोलीस महानिरीक्षक
2. नविनचंद्र दत्ता रेड्डी, पोलीस आयुक्त,
3. राजेंद्रसिंह प्रभूसिंह गौर, सहाय्यक पोलीस आयुक्त,

अत्युत्कृष्ट सेवा पदक (एमएसएम) चे मानकरी ठरलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे :
पोलीस दल (महाराष्ट्र)
1. प्रमोदकुमार परशराम शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक,
2. दत्तात्रय शंकर ढोले, सहाय्यक पोलीस आयुक्त,
3. संजय सुभाष चंदखेडे, पोलीस उपअधीक्षक,
4. शैलेंद्र रघुनाथ धिववार, सहाय्यक पोलीस आयुक्त,
5. ज्योती अरविंद देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त,
6. राजन आबाजी माने, सहाय्यक पोलीस आयुक्त,
7. कैलास मनोहर पुंडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त,
8. नरेंद्र कृष्णराव हिवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त,
9. दिपककुमार चुडामन वाघमारे, पोलीस निरीक्षक,
10. रवींद्र अंबुजी वाणी, पोलीस निरीक्षक,
11. संदीप शांताराम शिंदे, पोलीस उपनिरीक्षक,
12. संदीप यशवंत मोरे, पोलीस उपनिरीक्षक,
13. काशिनाथ दत्ता राऊळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,
14. जोसेफ मेरीयन डिसिल्वा, पोलीस उपनिरीक्षक,
15. सुनील भाऊराव चौधरी, पोलीस उपनिरीक्षक,
16. सत्यवान आनंद माशाळकर, पोलीस निरीक्षक,
17. अशोक सोनू जगताप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,
18. दीपक सुगनसिंग परदेशी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,
19. बाळासाहेब यशवंत भलचीम, पोलीस उपअधीक्षक,
20. आनंदराव मारुती पवार, पोलीस उपनिरीक्षक,
21. सुरेश दिगंबर कराळे, सहाय्यक पोलीस कमांडंट,
22. रमेश बबन वेठेकर, सहाय्यक पोलीस कमांडंट,
23. अनिल कृष्णराव ब्राह्मणकर, पोलीस उपनिरीक्षक,
24. रमेश नत्थुजी ताजने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,
25. ओहरसिंग द्वारका पटले, पोलीस निरीक्षक,
26. उभाष मधुकर हांडगे, पोलीस उपनिरीक्षक,
27. विश्वास रोहिदास पाटील, पोलीस निरीक्षक,
28. अविनाश रामभाऊ नवरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,
29. अनंत विष्णुपंत व्यवहारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,
30. सतीश भगवान जाधव, पोलीस निरीक्षक,
31. धोंडीबा माधवराव भुट्टे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,
32. हर्षकांत काशिनाथ पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक,
33. प्रमोद कारभारी पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,
34. राजेंद्र गोपाळराव मोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक,
35. जितेंद्र जगन्नाथ कोंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,
36. संजय दामोदर शिरसाट, सहायक पोलीस उपनिरीक्षक,
37. संजीव कुमार काशी माथूर, मुख्य पोलीस कॉन्स्टेबल
38. रमेश खुशालराव कुंभलकर, मुख्य पोलीस कॉन्स्टेबल
39. आंचल ईश्वरप्रसाद मुद्गल, पोलीस निरीक्षक

(हेही वाचा – समाजवादी पार्टीच्या आमदाराने भर सभागृहात का मानले CM Yogi Adityanath यांचे आभार?; वाचा संपूर्ण प्रकरण)

गृहरक्षक आणि नागरी संरक्षण सेवा (महाराष्ट्र)

1. हेमलता श्रीराम कांबळे, कंपनी कमांडर,
2. राजू गणपत सांबर, कंपनी कमांडर,
3. अनिल गणपत गावित, सहाय्यक उपनियंत्रक,
4. राजेंद्र पुंडलिक शेळके, प्लाटून कमांडर,
5. उमा चंद्रकांत कोळवले, प्लाटून कमांडर,

 

सुधारात्मक सेवेचे मानकरी (महाराष्ट्र)
1. राणी राजाराम भोसले, अधीक्षक,
2. राजाराम रावसाहेब भोसले, अतिरिक्त अधीक्षक,
3. गजानन काशिनाथ सरोदे, उपअधीक्षक,
4. संजय गंगाराम शिवगण, सुभेदार,
5. सुधाकर ओंकार चव्हाण, हवालदार,
6. राजेश मधुकर सावंत, हवालदार,
7. संजय सदाशिव जाधव, हवालदार,
8. विद्या भरत ढेंबरे, तुरुंग शिपाई,
(हेही वाचा –  लाडकी बहीण योजनेमुळेच महायुतीला २३८ जागा; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Sunil Tatkare यांचं विरोधकांना प्रत्युत्तर)

महाराष्ट्रातल्या 07 पोलिसांना शौर्य पदक, 03 पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 39 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक; अग्निशमन दलातील 03 जण शौर्य पदकाचे तर 05 जण गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या पदकाचे मानकरी आहेत. तसेच गृहरक्षक आणि नागरी संरक्षण सेवेच्या 05 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक; सुधारात्मक सेवेचे 08 जण गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या पदकाचे मानकरी ठरले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.