-
प्रतिनिधी
“१५०० रुपयांत महिलांचा स्वाभिमान विकत घेतला” असा आरोप करणाऱ्या विरोधकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी गुरुवारी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लाडकी बहीण योजना काय समजणार? ही योजना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आणल्यानेच महायुतीला २३८ जागांचा प्रचंड विजय मिळाला,” असा पलटवार त्यांनी मुंबईत भरलेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत केला.
तटकरेंनी (Sunil Tatkare) मतदारयादीवरून विरोधक महाराष्ट्राला लक्ष्य करत असल्याचाही आरोप केला. “मतदार यादीत आक्षेप नोंदवण्याची वेळ तेव्हा असते, पण विरोधकांनी तीच संधी सोडली. आता निराधार टीका करतायत,” असे ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असल्याने “स्री शक्तीशिवाय विजय शक्य नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
(हेही वाचा – Jammu and Kashmir च्या किश्तवाडमध्ये ढगफुटी ;10 जणांचा मृत्यू, Video Viral)
बैठकीत राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी महिलांना स्पष्ट संदेश दिला “विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीकडे न पाहता मिळालेल्या संधीचा फायदा घ्या. सोशल मीडियावर पक्षाचं काम ठळकपणे मांडा. स्थानिक स्वराज्य संस्था ही राजकारणाची पहिली पायरी आहे, ती गाठा.” राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनीही महिला शक्तीवर भर दिला. “पुरुषांपेक्षा महिला जास्त ताकदीने पक्षासाठी काम करतात. त्यामुळे आता पासूनच निवडणूक तयारीला लागा,” असं आवाहन त्यांनी केलं. (Sunil Tatkare)
बैठकीत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिला योजनांची माहिती दिली, तर महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संघटनात्मक वाढीचा आढावा मांडला. पक्षातील ज्येष्ठ नेत्या, पदाधिकारी आणि राज्यभरातील महिला नेतृत्वाच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत एक गोष्ट स्पष्ट झाली – राष्ट्रवादी महिला काँग्रेस आगामी निवडणुकांत निर्णायक शक्ती ठरणार आहे, आणि त्याची लढाई आता पासूनच सुरू झाली आहे. (Sunil Tatkare)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

