Indian Railway : १ मेपासून देशभरात रेल्वे होणार ठप्प; कारण…

20469

सध्या जुनी पेन्शन योजना हे विषय अधिक चिघळत चालला आहे. आता त्यामध्ये रेल्वे कर्मचारी संघटनाही उतरणार आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी रेल्वे संघटना १ मे पासून बेमुदत संपावर (Railway Strike) जाणार आहेत. त्यामुळे देशभरात रेल्वे (Indian Railway) ठप्प होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा Political Party : २०२२-२३ मध्ये ६ प्रमुख राजकीय पक्षांचे एकूण उत्पन्न ३ हजार ७७ कोटी; जाणून घ्या कोणत्या पक्षाची किती संपत्ती?)

१९ मार्च रोजी संपाची नोटीस देणार 

जुन्या पेन्शन योजनेसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांसह अनेक कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. त्यात रेल्वे एम्पलॉईज आणि वर्कर्सच्या विविध संघटना आहेत. जाँईट फोरम फॉर रिस्टोरेशन ऑफ ऑल्ड पेन्शन स्कीम अंतर्गत या संघटना एकजूट झाल्या आहेत. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर १ मे पासून देशभरात रेल्वे सेवा (Indian Railway) ठप्प  (Railway Strike) करू, असा इशारा या संघटनेने दिला आहे. याबाबत एक निवेदन जारी करण्यात आले आहे. सरकारने नव्या पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना सुरू करावी. आम्ही ही मागणी करत आहोत, परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अशावेळी आमच्याकडे संपाशिवाय  (Railway Strike) कुठलाही मार्ग नाही. विविध रेल्वे संघटना फोरमच्या बॅनरखाली १९ मार्चपासून रेल्वे मंत्रालयाला नोटीस पाठवून संपाबद्दल माहिती देतील. ज्यात संपामुळे देशातील रेल्वे सेवा (Indian Railway) ठप्प होऊ शकते असे म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.